28 C
Mumbai
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहर व अधीक्षक अभियंता पदांवर परसेवेतील अधिकारी नेमल्यास आंदोलन सुधाकर बडगुजर

नाशिक शहर व अधीक्षक अभियंता पदांवर परसेवेतील अधिकारी नेमल्यास आंदोलन सुधाकर बडगुजर

नाशिक महानगरपालिकेत शहर अभियंता आणि अधीक्षक अभियंता या पदांवर परसेवेतील अधिकारी नेमण्यास नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा कडाडून विरोध असून त्याला वेळीच मज्जाव न केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल,असा इशारा नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी महापालिका आयुक्तांना एका पत्रकाद्वारे दिला आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949मधील प्रकरण 4 कलम 45 अन्वये शहर अभियंता आदी पदांच्या नेमणुकीचे अधिकार महानगरपालिकेचे असून त्यानुसार सद्यस्थितीत शहर अभियंता आणि अधीक्षक अभियंता या पदांवर वरील कलमान्वये महापालिकेने नेमणुका केल्या असून आजपर्यंत ते अधिकारी या पदांवर कार्यरत आहेत.

नाशिक महानगरपालिकेत शहर अभियंता आणि अधीक्षक अभियंता या पदांवर परसेवेतील अधिकारी नेमण्यास नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा कडाडून विरोध असून त्याला वेळीच मज्जाव न केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल,असा इशारा नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी महापालिका आयुक्तांना एका पत्रकाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949मधील प्रकरण 4 कलम 45 अन्वये शहर अभियंता आदी पदांच्या नेमणुकीचे अधिकार महानगरपालिकेचे असून त्यानुसार सद्यस्थितीत शहर अभियंता आणि अधीक्षक अभियंता या पदांवर वरील कलमान्वये महापालिकेने नेमणुका केल्या असून आजपर्यंत ते अधिकारी या पदांवर कार्यरत आहेत. मात्र या पदांवर परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा घाट घातला जात असून तसे अधिकारी रुजू होण्याचे संकेत प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृतांनुसार समजते.परसेवेतील अधिकाऱ्यांना या पदांवर रुजू करून घेण्याची महापालिका प्रशासनाची कृती असेल तर ती अधिनियम 1949 च्या कलम 45 (6) नुसार बेकायदेशीर ठरेल हे महापालिका प्रशासनाने लक्षात घ्यावे. अशा कोणत्याही कृतीस महापालिका कर्मचारी कामगार सेनेचा कडाडून विरोध राहील लक्षात घ्यावे. अशा नियुक्त्यांना वेळीच अटकाव न केल्यास संघटनेतर्फे रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, आणि होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील हे लक्षात घ्यावे. महापालिकेच्या स्वायत्तेवर गदा आणण्याचे प्रकार होत असतील तर ते आम्ही मुळीच खपून घेणार नाही हे लक्षात घ्यावे असा इशाराही बडगुजर यांनी पत्रकात दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी