28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक दिवसाला एक कोटी वसुलीचे उदिष्ट मालमत्ता कर संकलन

नाशिक दिवसाला एक कोटी वसुलीचे उदिष्ट मालमत्ता कर संकलन

महापालिका करसंकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी जोर लावला असून आयुक्तांनी दिलेल्या २१० कोटींच्या उदिष्टापैकी फेब्रुवारीपर्यंत १७३ कोटी वसूल झाले आहेत. मार्च अखेरपर्यंत म्हणजे पुढिल पस्तीस दिवसात उर्वरीत उदिष्ट गाठावे लागणार असून दिवसाला एक कोटीची वसुली करावी लागेल. दिलासादायक बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता कर वसुली वीस कोटींनी सरप्लस आहे.महापलिकेच्या उत्पन्नात नगररचना विभागानंतर सर्वाधिक वाटा हा करसंकलन विभागाचा अाहे. गतवेळी करसंकलन विभागाने १८८ कोटीचा कर गोळा करत मनपाच्या इतिहासात रेकाॅर्डब्रेक वसुली केली होती. शेवटच्या टप्प्यात घाम गाळत अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेवटच्या टप्प्यात लक्ष साध्य केले होते.

महापालिका करसंकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी जोर लावला असून आयुक्तांनी दिलेल्या २१० कोटींच्या उदिष्टापैकी फेब्रुवारीपर्यंत १७३ कोटी वसूल झाले आहेत. मार्च अखेरपर्यंत म्हणजे पुढिल पस्तीस दिवसात उर्वरीत उदिष्ट गाठावे लागणार असून दिवसाला एक कोटीची वसुली करावी लागेल. दिलासादायक बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता कर वसुली वीस कोटींनी सरप्लस आहे.

महापलिकेच्या उत्पन्नात नगररचना विभागानंतर सर्वाधिक वाटा हा करसंकलन विभागाचा अाहे. गतवेळी करसंकलन विभागाने १८८ कोटीचा कर गोळा करत मनपाच्या इतिहासात रेकाॅर्डब्रेक वसुली केली होती. शेवटच्या टप्प्यात घाम गाळत अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेवटच्या टप्प्यात लक्ष साध्य केले होते. आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षासाठी करसंकलन विभागाला २१० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उदिष्ट दिले होते. उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या नेतृत्वात करसंकलन विभागाने सवलत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत पहिल्या तीन महिन्यात सत्तर कोटीपर्यंत बंपर वसुली केली. त्यानंतही वसुलीचा आलेख चढता आहे. आजमितीला २१० पैकी १७३ कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. गतवेळी हेच प्रमाण १५३ कोटी इतके होते. गतवेळेच्या तुलनेत यंदा सरपल्स असलो तरी मार्च अखेरपर्यंत ३७ कोटी वसूल करावे लागणार आहे. म्हणजे दिवसाला एक कोटी वसूल करावे लागतील. मध्यंतरी पंतप्रधान मोदींचा दौरा, मराठा कुणबी सर्वेक्षण यामुळे वसुलीच्या कामावर मोठा परिणाम झाला. तसेच मार्चपासून लोकसभा निवडणुकीच्या कामाची भर पडेल. त्यात करसंकलन विभागाे काम अवघ्या सत्तर कर्मचार्‍यांवर सुरु आहे. या सर्व अडचणीवर मात करुन करसंकलन विभागाला दिलेले उदिष्ट गाठण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे.

विभागनिहाय करवसुली

विभाग वसुली
सातपूर १८ कोटी ५९ लाख
ना. पश्चिम २८ कोटी ५६ लाख
नाशिक पूर्व २९ कोटी १५ ल‍‍ाख
पंचवटी ३२ कोटी ३३ लाख
नवीन नाशिक ३७ कोटी ५६लाख
नाशिक रोड २७ कोटी ४५ लाख

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी