29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाचे 50 अधिकारी जिल्हा प्रशासनाने घेतले आपल्याकडे

नाशिक मनपाचे 50 अधिकारी जिल्हा प्रशासनाने घेतले आपल्याकडे

अगोदरच नाशिक महापालिकेत मागील सुमारे 25 वर्षापासून नोकर भरती झाली नसल्याने साधारण 25 टक्के मनुष्यबळावर मनपाचा कारभार हाकला जात आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने मनपाचे 50 कनिष्ठ व वरिष्ठ लिपीकांना थेट आपल्याकडे घेऊन निवडणुकीच्या कामात गुंतवल्याने मनपाच्या कामावर त्याचा थेट परीणाम होणार आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसहिता सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या पद्धतीने तयारी जोरात सुरू केली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील लिपिक दर्जाचे 50 अधिकार्‍यांना थेट जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहे.

अगोदरच नाशिक महापालिकेत मागील सुमारे 25 वर्षापासून नोकर भरती झाली नसल्याने साधारण 25 टक्के मनुष्यबळावर मनपाचा कारभार हाकला जात आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने मनपाचे 50 कनिष्ठ व वरिष्ठ लिपीकांना थेट आपल्याकडे घेऊन निवडणुकीच्या कामात गुंतवल्याने मनपाच्या कामावर त्याचा थेट परीणाम होणार आहे.

लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसहिता सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या पद्धतीने तयारी जोरात सुरू केली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील लिपिक दर्जाचे 50 अधिकार्‍यांना थेट जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहे.विशेष म्हणजे आता फक्त 126 अर्थात नाशिक मधील देवळाली मतदार संघासाठी हे 50 मनपाचे अधिकारी घेण्यात आले आहे, तर आता नाशिक मध्य, पूर्व व पश्चिमसाठी देखील मनपाचे अधिकारी व सेवकांना घेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची असल्याची माहिती मिळाली आहे. जर जिल्हा प्रशासनाने मनपाचे चार विधानसभा मतदार संघात प्रत्येक 50 प्रमाणे 200 अधिकारी घेतले तर त्याचा परीणाम शहरातील नागरीकांना पुरविण्यात येणार्‍या सुविधांवर होणार आहे. मात्र निवडणुकीसाठी मनुष्यबळ घेण्यात येत असल्याने मनपाला विरोध देखील करता येत नाही.
पगार मनपाकडेच
नाशिक महापालिकेतील कर, नगर सचिव, बांधकाम, विभागीय अधिकारी कार्यालय आदी विभागातील एकूण 50 लिपीकांना जिल्हा प्रशासनाने आदेश काढून आपल्याकडे घेतले आहे. मात्र त्यांचा पगार मनपाच देणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी