29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्यासाठी ...

संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाचे यत्रणांना निर्देश.

मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत मा.न्या. श्री. संदीप शिंदे (निवृत्त) समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने घेण्यात बैठकीमध्ये सक्षम प्राधिकारी हे त्यांच्याकडे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना संकेतस्थळावर आढळलेल्या नोंदीचे अभिलेख ज्या विभागाचे/कार्यालयाचे असतील त्यांच्याकडून त्यांची प्रमाणित प्रत घेऊन येण्याची मागणी करीत असल्याची बाब आढळून आली आहे. त्याअनुषंगाने सक्षम प्राधिकारी यांना त्यांच्याकडे प्राप्त अर्जातील नोंदीचा अभिलेख हा संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असेल तर संकेतस्थळावर सदरची नोंद संबंधित यंत्रणानी तपासून ती नोंद असलेल्या अभिलेखाच्या सत्यतेची पडताळणी करणे शक्य आहे.

मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत मा.न्या. श्री. संदीप शिंदे (निवृत्त) समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने घेण्यात बैठकीमध्ये सक्षम प्राधिकारी हे त्यांच्याकडे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना संकेतस्थळावर आढळलेल्या नोंदीचे अभिलेख ज्या विभागाचे/कार्यालयाचे असतील त्यांच्याकडून त्यांची प्रमाणित प्रत घेऊन येण्याची मागणी करीत असल्याची बाब आढळून आली आहे. त्याअनुषंगाने
सक्षम प्राधिकारी यांना त्यांच्याकडे प्राप्त अर्जातील नोंदीचा अभिलेख हा संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असेल तर संकेतस्थळावर सदरची नोंद संबंधित यंत्रणानी तपासून ती नोंद असलेल्या अभिलेखाच्या सत्यतेची पडताळणी करणे शक्य आहे.

त्यामुळे सक्षम प्राधिकारी (उपविभागीय अधिकारी, महसूल) यांनी / त्यांच्या कार्यालयाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नोंदीच्या अभिलेखाची नव्याने प्रमाणित प्रतीची मागणी करणेची आवश्यकता नाही. याकरीता सर्व जिल्हाधिकारी, सर्व सक्षम प्राधिकारी (उपविभागीय अधिकारी, महसूल) यांनी ज्या नागरिकांच्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळलेला अभिलेख संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, केवळ अशा अभिलेखांबाबत जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करतेवेळी प्रमाणित प्रती ऐवजी नागरीकांनी सादर केलेल्या नोंदीच्या *अभिलेखाची खातरजमा संबंधित यंत्रणेने संबंधित विभागाच्या संकेतस्थळाच्या आधारे करावी . असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांनी दि.४/०२/२०२४ रोजीच्या पत्रकान्वये दिले आहेत.

जो अभिलेख संकेतस्थळावर अस्पष्ट आहे, त्याची सुस्पष्ट वाचनीय प्रत अपलोड करावी, तसेच अन्य भाषा/लिपितील अभिलेख मराठी भाषेतील देवनागरी लिपीत लिप्यांतर करुन मुळ अभिलेखाखाली अपलोड करावा. त्याचप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी ‘नोंदी आढळलेले अभिलेख स्कॅन करुन संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे तसेच, सक्षम प्राधिकाऱ्यांनी पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्रे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, ज्यांच्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरुपात प्रसिद्ध करणे,
जेणेकरुन जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता सदर नोंदी पुरावा म्हणून सादर करता येतील’ असेही निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी