28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक सातपूरला शिवगाथा महानाट्यतून उलगडला शिवरायांचा इतिहास

नाशिक सातपूरला शिवगाथा महानाट्यतून उलगडला शिवरायांचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवगाथा महानाट्याचे आयोजन जाणता राजा मैदान वीर सावरकर नगर येथे आयोजित केले होते. महाराष्ट्रावरील दौलतगिरीवर गनिमांच्या हल्ला. सामान्य जनतेवर अत्याचार, वैफल्यग्रस्त परिस्थिती परिस्थिती अशा परिस्थितीत शिवरायांचा जन्म,त्याचें बालपण, मावळे सवगंडी, स्वराज्याची शपथ, तोरणा किल्ला विजय, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाचा पराभव, पुरंदरचा तह, औरंगजेब भेट आग्र्याहून सुटका, पुन्हा स्वराज्याची उभारणी करत समुद्रावर भव्य नौदल उभारत कोकणासह 84 बंदरे उभारत स्वराज्य उभारणी, गागा भट्ट आगमन शिवरायांचा राज्याभिषेक, राज्याभिषेकादरम्यान नेत्रदीपक फटाके आणि नृत्य संगीतानं सर्वांना स्तंभित केलं. यावेळी सातपूरला जणू 'शिवकाळ' पुन्हा अवतरला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवगाथा महानाट्याचे आयोजन जाणता राजा मैदान वीर सावरकर नगर येथे आयोजित केले होते. महाराष्ट्रावरील दौलतगिरीवर गनिमांच्या हल्ला. सामान्य जनतेवर अत्याचार, वैफल्यग्रस्त परिस्थिती परिस्थिती अशा परिस्थितीत शिवरायांचा जन्म,त्याचें बालपण, मावळे सवगंडी, स्वराज्याची शपथ, तोरणा किल्ला विजय, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाचा पराभव, पुरंदरचा तह, औरंगजेब भेट आग्र्याहून सुटका, पुन्हा स्वराज्याची उभारणी करत समुद्रावर भव्य नौदल उभारत कोकणासह 84 बंदरे उभारत स्वराज्य उभारणी, गागा भट्ट आगमन शिवरायांचा राज्याभिषेक, राज्याभिषेकादरम्यान नेत्रदीपक फटाके आणि नृत्य संगीतानं सर्वांना स्तंभित केलं. यावेळी सातपूरला जणू ‘शिवकाळ’ पुन्हा अवतरला होता.

सातपूरला जणू ‘शिवकाळ’ पुन्हा अवतरला होता.सकाळी जाणता राजा मैदान-आनंद छाया -सातपूर कॉलनी-सातपूर कॉलनी सर्कल-महिंद्रा सर्कल-सातपूर राजवाडा-निगळ गल्ली-छत्रपती शिवाजी महाराज चौक व सातपूर गाव शिवप्रभात दिंडी काढण्यात आली पारंपारिक वेशभूषा सातपूरकर यावेळी उपस्थित होते. उत्सव समिती अध्यक्ष अनिल गडाख, कार्याध्यक्ष फरिदा शेख उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे,माजी नगरसेवक दिनकर पाटील, माजी स्थायी सभापती सलीम शेख, दिलीप गिरासे, विजय करंजकर, मधुशेठ जाधव,मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी साठी सातपूर शिवजयंती समिती सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी