28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा: मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित

पंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा: मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित

आरक्षणाचे आणि सरकारी नोकरीचे लाभ मिळवण्यात गुंतून अन्य सर्व समाज घटक आपलं मूळ पारंपरिक कौशल्य विसरले. मात्र, बांधकाम करणे, लाकूड काम-लोखंड काम करणे, नक्षीदार रचना निर्माण करणे, शेती अवजारे बनवणे यात आघाडीवर राहणाऱ्या सुतार समाजाने पारंपारिक कौशल्य टिकवून ठेवले हे कौतुकास्पद गोष्ट आहे. अशा प्रत्येक लहान समाज घटकांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचा मूळ उद्देश असून पंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा; असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.

आरक्षणाचे आणि सरकारी नोकरीचे लाभ मिळवण्यात गुंतून अन्य सर्व समाज घटक आपलं मूळ पारंपरिक कौशल्य विसरले. मात्र, बांधकाम करणे, लाकूड काम-लोखंड काम करणे, नक्षीदार रचना निर्माण करणे, शेती अवजारे बनवणे यात आघाडीवर राहणाऱ्या सुतार समाजाने पारंपारिक कौशल्य टिकवून ठेवले हे कौतुकास्पद गोष्ट आहे. अशा प्रत्येक लहान समाज घटकांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचा मूळ उद्देश असून पंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा; असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार शहरातील भोणे वळण रस्त्यावरील सुतार समाजाच्या नियोजित सामाजिक भवनाचे भूमिपूजन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आणि खासदार डॉक्टर हिना गावित व जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री आठ वाजता संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला सुतार समाजाचे अध्यक्ष वाल्मिक जगताप, सोमनाथ सुतार, नामदेव सूर्यवंशी, आत्माराम बोरसे, महेंद्र हिरे, दादाभाई बोरसे, हिरालाल गवळे, रवी बोरसे, सुभाष सूर्यवंशी, दौलत सूर्यवंशी, चेतन सोनवणे, वसंत बोरसे, नथू मिस्त्री, सुनील बोरसे, हर्षल खैरनार, ज्ञानेश्वर गवळे, पिन्टू सुतार, कन्हैया जगताप आदी उपस्थित होते. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सुतार समाज भवन उभारणीसाठी दोन कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळवून दिली असून महाराष्ट्रात प्रथमच सुतार समाजभावनासाठी एवढा मोठा निधी मंजूर झाल्याचे उपस्थितांमधून सांगण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख भाषणात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले, पूर्वी गावाचा कारभार बारा बलुतेदारांवर अवलंबून होता आणि त्या सर्व समाजापैकी सुतार समाज हा एक प्रमुख घटक होता. आजही नक्षीदार मंदिर निर्मिती असो, शेती अवजारे बनवण्याचे उद्योग असो, किंवा बांधकाम क्षेत्र असो सुतार समाज अग्रेसर असतो. अशा घटकांच्या प्रगतीचा विकासाचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक समाजाला न्याय मिळेल याची दक्षता घेतली. आपण सर्वांनी एकोप्याने राहावे आपले सर्वांची प्रगती आणि विकास व्हावा ही यामागची तळमळ आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी भाषणात सांगितले, सुतार समाजातील तरुण लाकूड काम शेती अवजार बनवणे ॲल्युमिनियम सेक्शन बनवणे यासारख्या उद्योगात प्रगती करू इच्छित असतील त्या सर्वांना सुवर्णसंधी आहे आधुनिक यंत्राच्या माध्यमातून ते प्रगती करू शकतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यासाठी प्रशिक्षणाची सोय असून गरजू तरुणांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे.
खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी भाषणात सांगितले की, केवळ रस्ते गटारी पाणी व्यवस्था एवढ्या पुरताच विकास निधी वापरावा हा पारंपारिक दृष्टिकोन मोदी सरकारने बदलवून टाकला आहे. या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच समाज घटक एकत्र कसे येतील आणि त्या प्रत्येकाच्या घरापर्यंत लाभ कसे पोहोचतील याचे प्रयत्न आम्ही करीत आहेत आणि म्हणूनच समाज भवन उभारणीसाठी प्रत्येक समाजाला दोन दोन कोटी रुपये भरीव निधी देण्याचे प्रयोजन आम्ही केले. मोदी सरकारने विश्वकर्मा योजना अमलात आणली असून विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा; असेही आवाहन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी