28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वच्छ हवेचा निधी मार्चपर्यंत खर्च करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर

स्वच्छ हवेचा निधी मार्चपर्यंत खर्च करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर

केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्यावतीने महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीपैकी केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने येत्या मार्चअखेरपर्यंत उर्वरित निधी खर्च करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी संबंधित विभागांना बैठकीत दिले. हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामअंतर्गत (एनकॅप) महापालिकेला प्राप्त झालेल्या ८७ कोटींपैकी अवघा २० कोटींचाच निधी खर्च झाला आहे. केंद्राकडून एन कॅप योजनेंतर्गत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे व यंत्र सामग्री खरेदीसाठी मनपाला वर्षाला वीस कोटी, असा मागील चार वर्षांत ऐंशी कोटींचा निधी दिला;

पण त्यापैकी पर्यावरण विभागाला अवघा २० कोटी रुपये निधी खर्च करता आला. उर्वरित निधी कागदावरच विविध उपाययोजनांसाठी खर्च करण्याचे नियोजन आहे.
एन कॅपच्या निधीत कपात केल्यानंतर जो पंधरा कोटींचा निधी प्राप्त होणार आहे, त्याचे आतापासूनच खर्चाचे नियोजन केले आहे. बारा कोटी निधी केंद्राकडून मिळणाऱ्या पन्नास पीएम ई-बससाठी आडगाव येथे डेपो व चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. या डेपोची पाहणी काही दिवसांपूर्वीच केंद्राच्या समितीने केली. त्यानंतर तेथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निश्चित करण्यात आले. उर्वरित तीन कोटी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी फाॅगिंग व्हॅन खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे.
———-
शासनाकडून निधी वितरित
केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने २०२४ पर्यंत भारतातील हवा प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याच्या दृष्टीने एन कॅप उपक्रम हाती घेतला आहे. १० जानेवारी २०१९ रोजी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप) आखण्यात आला. त्यानुसार विविध कामे तसेच प्रकल्प राबविण्याकरिता केंद्र शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरित करण्यात आला आहे. महापालिकेला २०१९ पासून आतापर्यंत ८७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे; परंतु गेल्या पाच वर्षांत अवघे २० कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता मार्चअखेर म्हणजे आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने या कालावधीत ७५ टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना व त्यानुसार प्रकल्प राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांनी खातेप्रमुखांची बैठक घेत एन कॅपअंतर्गत करण्यात येत असलेली विविध कामे, तसेच प्रकल्पांचा आढावा घेतला.
————
मनपाकडून सध्या सुरू असलेली कामे
विद्युत दाहिनी बसवणे
यांत्रिकी झाडूंची खरेदी
शौचालयावर सौर पॅनल बसवणे
सायकल ट्रॅक
दुभाजक ग्रीनरी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी