32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकडक उन्हामुळे तापाच्या रुग्णांत वाढ! पारा ३९ अंशाच्या पुढे गेल्याने जीवाची काहिली

कडक उन्हामुळे तापाच्या रुग्णांत वाढ! पारा ३९ अंशाच्या पुढे गेल्याने जीवाची काहिली

शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून तापमान वाढत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव सुरु आहेत. लग्न सोहळ्यांची धूम वऱ्हाडींचा घाम काढत आहे. अनेकांना नाईलाजाने का होईना उन्हात जाणे भाग पडत आहे. पारा ३९ अंशाच्या आसपास आहे. कडाक्याचे ऊन डोक्यावर झेलत नागरीकांना लग्नसोहळ्यांना हजेरी लावावी लागत आहे. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाने अनेकजण आजारी पडत आहेत. यात तापाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाने कात टाकली आहे.

शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून तापमान वाढत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव सुरु आहेत. लग्न सोहळ्यांची धूम वऱ्हाडींचा घाम काढत आहे. अनेकांना नाईलाजाने का होईना उन्हात जाणे भाग पडत आहे. पारा ३९ अंशाच्या (39 degree) आसपास आहे. कडाक्याचे ऊन डोक्यावर झेलत नागरीकांना लग्नसोहळ्यांना हजेरी लावावी लागत आहे. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाने अनेकजण आजारी पडत आहेत. यात तापाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाने कात टाकली आहे.(The scorching heat has led to an increase in fever cases. Death toll as mercury crosses 39 degrees mark)

२१ व २२ एप्रिल हे दोन दिवस वगळता पारा ४० अंशाच्या वरच आहे. २१ एप्रिलला ३९.२ व २२ एप्रिलला ३९.६ एवढे तापमान होते. संपूर्ण एप्रिल महिना कडक उन्हात जात आहे. यात राष्ट्रपुरुषांच्या जयंती, सण-उत्सव व चैत्रोत्सव यात्रा पार पडली. कडक ऊन अंगावर झेलत श्रद्धाळू पायी यात्रेने गडावर गेले. सध्या येथील शासकीयसह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. यात तापाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

अशी घ्या काळजी

शक्य तेवढे पुरेसे पाणी प्यावे. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. लिंबू-पाणी, ताक, लस्सी, फळांचा रस व थोडे मीठ घालून घरगुती पेयांचे सेवन करावे. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी आदी पदार्थ खावीत. पातळ सैल, सूती कपडे वापरावे. बाहेर पडताना छत्री, टोपी, टॉवेल, गॉगलचा वापर करावा. दुपारी बारा ते पाच या वेळेत शक्यतो बाहेर पडू नये.

तारीख – तापमान

१५ एप्रिल – ४२.६

१६ एप्रिल – ४२.६

१७ एप्रिल – ४३.२

१८ एप्रिल – ४३.४

१९ एप्रिल – ४२.०

२० एप्रिल – ४१.६

२१ एप्रिल – ३९.२

२२ एप्रिल – ३९.६

२३ एप्रिल – ४१.८

२४ एप्रिल – ४२.०

२५ एप्रिल – ४२.०

२६ एप्रिल – ४१.०

२७ एप्रिल – ४२.०

२८ एप्रिल – ४२.०

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी