28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकस्टम क्लिअरिंग केंद्रांवर अधिकचे कर्मचारी व वेळ वाढविणार - अजित दान

कस्टम क्लिअरिंग केंद्रांवर अधिकचे कर्मचारी व वेळ वाढविणार – अजित दान

कस्टमचे अप्पर आयुक्त अजित दान व उपायुक्त ओमकार कांचनगिरे यांची महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निर्यातदार, डीलर्स, शेतकरी यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या. समस्यांचे निराकरण करण्यासाठी कस्टम क्लिअरिंग केंद्रांवर अधिक आणि पुरेसे कर्मचारी नियुक्त करण्याची  मागणी केली.  समस्या जाणून घेऊन सकारात्मक चर्चा करून तात्काळ कस्टम क्लिअरिंग केंद्रांवर कर्मचारी नियुक्ती व वेळ वाढविण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. अग्रिकल्चर समितीचे चेअरमन राजाराम सांगळे यांनी नाशिकमधून मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते  सध्या द्राक्षाचा हंगाम सुरु आहे द्राक्षांची निर्यात करतांना येणाऱ्या विविध अडचणीची माहिती देऊन वेळेवर कस्टम केंद्रावरून परवानगी न मिळाल्यास उशीर होतो

आणि माल खराब होऊन नुकसान होते त्यासाठी केंद्रावर तपासणीची वेळ वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा यांनी कस्टम क्लिअरिंग केंद्रांवर ३ शिप मध्ये काम व्हावे व त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे सांगितले. शाखा चेअरमन संजय सोनवणे यांनी  महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती देऊन निर्यात वाढावी यासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. तसेच निवेदनात कस्टम अधिकाऱ्यांची सध्याची वेळ सकाळी 10 ते 6.00 अशी आहे जी दोन शिफ्टमध्ये सकाळी 9 ते 6 आणि संध्याकाळी 6 ते 12 अशी बदलणे आवश्यक आहे. रेफ्रिजरेटेड कंटेनर न्हावाशेवा JNPT मधून येतात, कंटेनर बहुतेक ट्रॅफिक समस्यांमुळे दुपारपर्यंत कोल्ड स्टोरेजमध्ये पोहोचतात आणि संध्याकाळी कस्टम क्लिअरन्ससाठी जातात.  बऱ्याच वेळा कंटेनर चालकांकडून या व्हॅनचे जनरेटर बंद केले जातात त्यामुळे निर्यात सामग्रीचा दर्जा खराब होतो. पूर्ण हंगाम असल्याने कंटेनरचा भारही जास्त असतो. तपासणीसाठी प्रतीक्षा कालावधी आणि त्यानंतर प्रत्यक्ष माल पाठवण्याचा कालावधी बराच मोठा आहे ज्यामुळे द्राक्षांच्या गुणवत्तेवर तसेच शेल्फ लाइफवर परिणाम होतो. या समस्याचा  विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा,शाखा चेअरमन संजय सोनवणे, अग्रिकल्चर समितीचे चेअरमन राजाराम सांगळे, सल्लागार दिलीप साळवेकर, सहाय्यक सचिव अविनाश पाठक उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी