31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहिलांनी आपल्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज - ॲड. नितिन ठाकरे

महिलांनी आपल्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज – ॲड. नितिन ठाकरे

समाजासाठी उद्योगाबाबत असे विधायक उपक्रम राबवले पाहिजे. महिलांनी आपल्यातील कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आता उंबरठा ओलांडून उद्योग जगतात येण्यासाठी धडपड केली पाहीजे. तरच आपली आणि परिवाराची आर्थिक उन्नती होवून आपला स्वाभिमान जागृत ठेवता येईल असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. ते कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी विद्यालयात मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या महिला कक्षाकडून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष विशाल देसले, डाॅ. विश्वास पाटील, वत्सला खैरे, विशाल वावरे, माधुरी भदाणे, सारिका भोईटे पवार, डॉ , आश्विनी बोरस्ते, डॉ. रिता पाटील आदि उपस्थित होते.

समाजासाठी उद्योगाबाबत असे विधायक उपक्रम राबवले पाहिजे. महिलांनी आपल्यातील कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आता उंबरठा ओलांडून उद्योग जगतात येण्यासाठी धडपड केली पाहीजे. तरच आपली आणि परिवाराची आर्थिक उन्नती होवून आपला स्वाभिमान जागृत ठेवता येईल असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. ते कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी विद्यालयात मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या महिला कक्षाकडून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष विशाल देसले, डाॅ. विश्वास पाटील, वत्सला खैरे, विशाल वावरे, माधुरी भदाणे, सारिका भोईटे पवार, डॉ , आश्विनी बोरस्ते, डॉ. रिता पाटील आदि उपस्थित होते. nashik develop skills< nashik news>

उद्योगातून आत्मविश्वासाकडे या धोरणानुसार उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ “उद्योग मैत्रीण”च्या संपादिका सारिका भोईटे यांनी महिला उद्योजिका संधी आणि आव्हान या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले कि, स्वतःवर विश्वास ठेवून धरसोड वृत्तीला दूर सारुन सातत्याला मित्र बनवा त्यानंतर आपल्या यशात कोणीच अडथळा ठरत नाही असे सांगितले. वरूण ॲग्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका मनिषा धात्रक यांनी यशस्वी महिला उद्योजक कसे व्हावे यासंदर्भात आपले अनुभव कथन केले. दुसर्‍या सत्रात महिला बचतगटाच्या माध्यमातून व्यवसायातील संधी या विषयावर नाशिक जिल्हा महिला बचत गटाच्या अध्यक्षा डाॅ. अश्विनी बोरस्ते यांनी समूहातील कुटीर उद्योग यशस्वी होण्यासाठी सामुदायिक समर्पण कामी येतं तेव्हा महिलांनी बचतगटाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेवून कार्यरत झालं पाहिजे असे आवाहन केले. समारोपाच्या सत्रात महिलांचे आरोग्य आणि जागरूकता तसेच जीवन शैली, स्वच्छता, लसिकरण विषयावर डाॅ. रिता पाटील यांनी महिलांना बालपण, तारुण्य ते म्हातारपणातील महिलांच्या आरोग्यावर प्रबोधनात्मक माहिती दिली ज्यामुळे महिलांच्या अनेक प्रश्नाना उत्तर मिळाली. यावेळी लकी ड्राॅ काढून विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. प्रायोजक कलासाई पैठणी, येवला कडून जाहीर प्रथम बक्षिसाच्या मानकरी सौ.सरोज साळुंके ठरल्या. त्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. मायरा आणि कला साई यांच्यातर्फे तिन पैठणी आणि इतर बक्षिसांसाठी पुनम संदीप सुर्यवंशी, गितांजली पवार आणि श्वेता कुणाल देसले यांना विजेता म्हणून घोषित करून बक्षीस वितरीत करण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्रणिता गायकवाड, सोनल वावरे, स्मिता आहेर, रचना पाटील, डॉ. सारिका महाले, डॉ. तृप्ती देसले, योगिता सोनवणे, विद्या आमले, निशा पवार, शर्मिला देशमुख, पल्लवी बच्छाव, सारिका पाटील,प्रतिभा चंद्रकांत पाटील ,जयश्री दिलीप भुसाळ ,प्रतिभा म्हसके ,पूनम सोमवंशी ,श्वेता देसले ,सोनिया शेवाळे ,सोनाली ठाकरे ,जान्हवी मानकर ,अदिती अग्रवाल ,गीतांजली पवार योगिता शिंदे आदिंनी परिश्रम घेतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी