28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर मुस्लिम आरक्षणासाठी सरकार विरोधात मोर्चा काढणार

प्रकाश आंबेडकर मुस्लिम आरक्षणासाठी सरकार विरोधात मोर्चा काढणार

टीम लय भारी

मुंबई :- ओबीसी आरक्षणासाठी भाजपाने 26 जूनला चक्का जाम आंदोलन केले होते. आता मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतला आहे. येत्या 5 जुलैला सरकार विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मोर्चा काढणार आहेत (Prakash Ambedkar will take out a morcha against the government).

मुंबईत आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. पण मुस्लिम आरक्षणबाबत आणखी निर्णय झाला नाही. सेक्युलर म्हणणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अजून मुस्लिमांना आरक्षण दिले नाही. सरकारविरोधात येत्या 5 जुलैला विधानभवनावर भव्य मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीसह रजा आकदमी सोबत असणार आहेत. अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत दिली (This information was given by Prakash Ambedkar in a press conference).

शरद पवार मोठे नेते आहेत, हे मी मानत नाही; गोपीचंद पडळकर

मोदींच्या अच्छे दिनवर राहुल गांधींचा फटकार, देशातील सुशिक्षित तरुण रिक्षावाले भजीवाले झाले

यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या राज्यात कोरोनाची तिसरी लाट येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मोर्चा काढणार आहोत. मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण कोर्टाने मंजूर केल आहे. परंतु सरकारने ते जाहीर केले नाही, सरकारने ते जाहीर करावे. अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत सरकारकडे केली आहे. पदोन्नती आरक्षणाबाबत बाबत वाद सुरू आहे. एम्पिरिकल डाटा सरकारला जमा करावा लागेल असे प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत (Prakash Ambedkar has said in a press conference that the government will have to submit empirical data).

Prakash Ambedkar will take out a morcha against the government
प्रकाश आंबेडकर

मविआचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंगवरून प्रविण दरेकर यांची बोचरी टीका

Kolhapur: Prakash Ambedkar to take part in silent sit-in protest today

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले भाजपचे राजकारण लोकांच्या लक्षात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये दंगा होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हिंदू मुस्लिमांना भडकवले जात आहे. आता खरेच दंगा भडकवणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदा होणे गरजेचे आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्याला कायद्याअन्वये शिक्षा व्हावी. महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असे आव्हान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे (Prakash Ambedkar has challenged the Maharashtra government and the central government to take a decision).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी