28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रचॉकलेट व गोळ्या वाटून मते मिळत नसतात, राम शिंदेंचा रोहित पवारांवर निशाणा

चॉकलेट व गोळ्या वाटून मते मिळत नसतात, राम शिंदेंचा रोहित पवारांवर निशाणा

लयभारी न्यूज नेटवर्क 
जामखेड : विरोधकांनी या मतदारसंघात काय विकासकामे केली हे सांगावे केवळ चॉकलेट, गोळ्या व पॅड वाटून मते मिळत नसतात. मतदारसंघातील जनता या प्रलोभनाला बळी पडणार नाही.आपल्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे जनता मतपेटीद्वारे दाखवून देणार आहे असे सांगत मतदारसंघातील जनतेचा मिळणारा उदंड  प्रतिसाद पाहता आता मतदारांनीच ठरवले आहे आमदाराला मत द्यायचे की नामदारला असे प्रतिपादन  राम शिंदे यांनी केले.
चॉकलेट व गोळ्या वाटून मते मिळत नसतात, राम शिंदेंचा रोहित पवारांवर निशाणा
रा शिंदे गावकऱ्यांना संबोधित करताना
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील उरे वस्ती येथे पालकमंत्री राम शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यानंतर आयोजीत कॉर्नर सभेत ते बोलत होते.
हे सुद्धा वाचा
मागील पाच वर्षांत मंत्रीपदाच्या काळात मोठय़ा प्रमाणावर निधी खेचून आणला यामुळे वीज पाणी रस्ते या मुलभूत समस्या सोडवल्या आता पुढील काळात शेतीला शाश्वत पाणी मिळावे यासाठी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना राबवून तालुका दुष्काळ मुक्त करणार आहे. साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे तसेच सुत गिरणी मंजूर करून नऊ कोटीचा निधी मिळवून दिला.
– राम शिंदे
मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आर्थिकदृष्टय़ा सक्षम होतील याकरिता बचतगटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. तत्पूर्वी राम शिंदे यांनी नान्नज गावात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली तसेच मुस्लिम समाजाची बैठक युवा नेते अमजद पठाण यांनी घडवून आणली यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्या मांडल्या त्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले.
चॉकलेट व गोळ्या वाटून मते मिळत नसतात, राम शिंदेंचा रोहित पवारांवर निशाणा
राम शिंदे यांना प्रचारात गावोगावी महिला अशा पद्धतीने औक्षण करीत आहेत.
निकालानंतर रोहित पवार मतदारसंघात दिसणार नाहीत – राम शिंदे 
उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची उत्स्फूर्त झालेली गर्दी व त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, गावभेट दौऱ्यात महिलांचा सहभाग,  युवकांचा ओढा यामुळे दिवसेंदिवस जनतेचे समर्थन वाढत आहे. त्यामुळे २१ तारखे नंतर रोहीत पवार मतदारसंघात दिसणार नाहीत अशी खोचक टिका पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.
[box type=”shadow” align=”aligncenter” class=”” width=””]नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी