31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्र... या कारणामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

… या कारणामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

टीम लय भारी

मुंबई :- दहावी-बारावीच्या विद्यार्थांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयाची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवड यांनी केली होती. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत आहे. विद्यार्थांनी त्या प्रश्नपेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. परंतु त्यामध्ये काही प्रश्न एकापेक्षा जास्त वेळा प्रसिध्द करण्यात आले आहेत, तर वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबतही प्रश्न देण्यात आले आहेत. त्यामुळेच पालक आणि विद्यार्थी नाराज असून सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. पहिल्या टप्प्यात बारावीच्या सात आणि दहावीच्या सहा विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. येत्या काही दिवसांत सर्व विषयांचे प्रश्नसंच मिळणार आहेत. लॉकडाउनमुळे शाळा अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव पुरेसा झालेला नाही. यातच परीक्षाही ऑनलाइन घ्याव्या की ऑफलाइन घ्याव्यात, याबाबत चर्चा सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पालक, शिक्षक यांच्या मागणीनुसार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते. यानुसार हे संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या संचांमध्ये काही चुका असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे पुढे येणारे प्रश्नसंच योग्य पद्धतीने तपासून अपलोड करावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहेत. यंदा दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाबाबतचे प्रश्न ही यामध्ये देण्यात आले आहे. यामुळे हे प्रश्नसंच अभ्यासपूर्णरित्या तयार झाले नसल्याची टीका ही होत आहे.

तज्ज्ञांना सहभागी करून घेतले नाही

प्रश्नसंच तयार करताना विषयाच्या अभ्यास मंडळातील सदस्यांना सहभागी करून घेतले नाही. याचबरोबर यासाठी आवश्यक ती छाननी प्रक्रियाही राबिवली नाही, अशी टीका अभ्यास मंडळाच्या माजी सदस्यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी