33 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रशिवराज्याभिषेक सोहळ्यात तटकरेंना दिलेल्या वागणूकीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

शिवराज्याभिषेक सोहळ्यात तटकरेंना दिलेल्या वागणूकीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार आज (दि.2 जून) रोजी राज्य सरकारच्यावतिने रायगडावर दिमाखात साजरा केला जात आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, राज ठाकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांची रायगडावर उपस्थिती होती. मात्र या सोहळ्यात खासदार सुनिल तटकरे यांना बोलण्याची संधी न दिल्यामुळे ते कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप दिल्याचे म्हणत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची रायगडचे खासदार या नात्याने देखील उपस्थिती होती. यावेळी राजशिष्टाचाराचे पालन न करता खासदार तटकरे यांना कार्यक्रमस्थळी बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे तटकरे तेथून तडकाफडकी निघून गेले. त्यानंतर तटकरे यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, राज्याभिषेक सोहळ्याला एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी उपस्थित होतो. मात्र यावेळी राजशिष्टाचाराचे नियम पायदळी तुडवले. मला वाटले होते मला बोलण्याची संधी देतील, पण तसे झाले नाही. त्यामुळे मी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम राज्य सरकारचा होता मात्र जणूकाही आपणच हा कार्यक्रम करत आहोत असा दिखाऊपण केला जात होता, असे देखील तटकरे म्हणाले.
या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर प्रतिक्रीया देत सरकारचा निषेध केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रायगड लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे यांना बोलू दिले नाही. या भागाचे खासदार म्हणून त्यांना यथोचित प्रोटोकॉल आणि सन्मान देणे ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु शासनाने या कार्यक्रमाला राजकीय कार्यक्रमाचे स्वरूप दिले हे अतिशय खेदजनक आहे. झाल्या प्रकाराचा निषेध.

हे सुद्धा वाचा

चालकाची तब्बेत अचानक बिघडली अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दाखवली जिगर

त्वचेला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी “या” पाच गोष्टी नक्की करा…!

शिवराज्याभिषेक दिन 2023 : मोदी म्हणाले, शिवरायांची प्रेरणा घेऊन अमृत काळातील पुढचा 25 वर्षांचा प्रवास करणार

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी