31 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा प्रचार करत आहेत

पंतप्रधान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा प्रचार करत आहेत

टीम लय भारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर भाष्य करत भाजपवर टीका केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चा भाजपा आणि पंतप्रधान प्रचार करत आहे. भाजपाचे समर्थक हा चित्रपट पाहणारच असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या चित्रपटात सत्य लपवण्यात आले आहे आणि ते चित्रपटामध्ये यायला हवे होते असं ही त्यांनी म्हटलं आहे.

राऊत म्हणतात की, या चित्रपटाला आता राष्ट्रीय पुरस्कार मिळेल. अग्निहोत्री यांना पद्मश्री किंवा पद्मभूषण पुरस्कार देण्यात येतील. देशात ज्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे, त्यामध्ये हे सर्व होणारच आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम यांच्यात अधीक दुरावा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण देशाला माहिती आहे की, काश्मीरमध्ये हिंदू पंडितांना अत्याचाराला सामोरे जावे लागलं होतं.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाने आतापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला भाजपचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. या सिनेमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपच्या नेत्यांनी समर्थन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी