29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना;11 वर्षीय मुलीवर वडील, भाऊ, आजोबा अन् मामाकडून...

नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना;11 वर्षीय मुलीवर वडील, भाऊ, आजोबा अन् मामाकडून बलात्कार

टीम लय भारी

मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना पुण्यात घडली आहे. 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मामासह बाप, भाऊ आणि आजोबा या तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. कोरेगाव पार्क येथील एका इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीनं समुपदेशन करणाऱ्या महिलेला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय समुपदेशक महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बंडगार्डन पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत पिडित मुलीचे वडील (वय 45), भाऊ (वय 14), आजोबा आणि चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या सगळ्या प्रकरणावर पुण्याचे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्यांनी काही मागण्या केल्या आहेत.

१) आरोपी वडील यास त्वरित अटक करावी

२) आरोपी आजोबा व चुलत मामा यांचा जामीन नामंजूर करावा

३) अल्पवयीन आरोपी भाऊ यांस बालनिरीक्षण गृहात पाठविण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी

४) मनोधैर्य योजनेची मदत मिळवून देण्यात यावी

५) मुलीस समुपदेशन करून तिची परीक्षा व शाळा चालु राहील हे पहावे या घटनेचे चार्जशीट लवकरात लवकर दाखल करावी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी