28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeआरोग्यBreaking : 'करोना'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी, जीआर जारी

Breaking : ‘करोना’मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी, जीआर जारी

टीम लय भारी

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज महत्वाचा आदेश (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील सगळ्या सरकारी कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आळीपाळीने कामावर यावे तसेच ज्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना रजा हवी असल्यास ती तातडीने मंजूर करावी असे या जीआरमध्ये नमूद केले आहे.

Breaking : 'करोना'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी, जीआर जारीBreaking : 'करोना'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी, जीआर जारी
या आदेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना एक आड दिवस कामावर येण्याची सवलत राहील असे सूत्रांनी सांगितले. सामान्य प्रशासन विभागाने हा आदेश जारी केला आहे.
कामाच्या वेळांमध्ये सुद्धा लवचिकता ठेवण्यात येणार आहे. वाहतुकीमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी ही सुविधा दिली आहे.
हा आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व आपत्कालिन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र सुटीचा लाभ मिळणार नाही असे आदेशात नमूद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी