32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रसंघर्षातुन पुढे आलो आहे , लढणं माझ काम : आमदार शशिकांत शिंदे

संघर्षातुन पुढे आलो आहे , लढणं माझ काम : आमदार शशिकांत शिंदे

टीम लय भारी

पाचगणी : जावली तालुक्यातील राजकीय वातावरण जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे गरम झाले आहे. जावलीचे भुमीपुत्र आमदार शशिकांत शिंदे यांना जावलीतुन बिनविरोध निवडणुकीला सामोरे जाऊ लागणार का? याबाबत जावली तालुक्यात खंमग चर्चा होत आहेत (Shashikant Shinde have to face unopposed elections from Jawali? This is being discussed in Jawali taluka).

विधानपरीषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना “संघर्षातुन पुढे आलो आहे , लढणं माझ काम “ असे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे जावलीची जिल्हाबॅकेची निवडणुक रंगतदार होणार का, याबाबत आता जावलीत रणभुमी तापली आहे.

रस्ते सुधारणीसाठी ६ कोटींचा निधी जाहीर, विजय वडेट्टीवारणी केले भूमिपूजन

भिवंडीत म्हाडा बांधणार 20,000 घरे : जितेंद्र आव्हाड

शशिकांत शिंदे यांनी जिल्हाबॅकेच्या निवडणुका ज्या पक्षविरहीत लढल्या जातात, त्यासाठी अजुन कोणतीही बैठक वरीष्ठ पातळींवर झाली नाही. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या माध्यमातुन पक्ष आदेश देईल त्यावेळेस मला भुमीका घ्यावीच लागेल. जावली तालुक्यांत पक्षाच्या माध्यमातुन काम करण्यास मी सदैव तयार आहे अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली.

जावली तालुक्यात विकास सोसायटीच्या माध्यमातुन आपल्या समोर संघर्ष उभारला जातोय याबाबत विचारले असता, मी संघषातुन पुढे आलो आहे, लढणं माझं  काम असल्याचं यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

व्यापारी असोसिएशनच्या विकासकामांसाठी आमदार रोहित पवारांनी दिले निधीचे आश्वासन

Shashikant Shinde
संघर्षातुन पुढे आलो आहे , लढणं माझ काम : आ शशिकांत शिंदे

BJP had offered to spend Rs 100 crore to get me elected in assembly poll: NCP leader

दरम्यान शशिकांत शिंदे यांची जावलीतील दर्पोक्ती लढायची असल्याने, जिल्हा बॅकेत जर बिनविरोध झाली नाही तर लढायची देखील तयारी जावलीचे सुपुत्र यांनी दाखवली. जावलीतील  शशिकांत शिंदे गट चार्ज झाला असल्याचे आता लपून राहीले नाही.

गेल्या काही दिवसांपासून शशिकांत शिंदे जिल्हा बॅकेबाबत काय भुमीका घेणार याबाबत जावलीत चर्चा सुरु आहे. शशिकांत शिंदे यांच्या लढणं माझ काम हा मूलमंत्र नक्की काय समीकरण मांडणार याबाबत आता जावलीत वातावरण ढवळून निघाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी