30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे सरकारचा सेवानिवृत्त पत्रकारांसाठी मोठा निर्णय; पेन्शनमध्ये होणार भरघोस वाढ

शिंदे सरकारचा सेवानिवृत्त पत्रकारांसाठी मोठा निर्णय; पेन्शनमध्ये होणार भरघोस वाढ

९ मे रोजी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत निवृत्त पत्रकारांना दरमहा ११ हजार ऐवजी २० हजार रूपये निवृत्ती वेतन देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचा शासन निर्णय अजून जारी करण्यात आला नसल्याची बाब विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी सभागृहात उपस्थित केली. यासंदर्भातील शासन निर्णय येत्या दोन दिवसांत जारी केला जाईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली.

विधान परिषदेत आज पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने विधान परिषद सदस्य यांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज खालील निर्णय घेण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत निवृत्तीचे वय ५८ आणि २५ वर्षे अनुभव असा निर्णय करण्यात यावा अशी मागणी विधान परिषद सदस्य सुनिल शिंदे यांनी केली. त्यानुसार तातडीने निर्णय घेवून जाचक अटी कमी केल्या जातील असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिले. स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार सुवर्णमहोत्सवी कल्याण निधी हा ट्रस्ट असून यामध्ये सध्या ५० कोटींची तरतूद आहे. ( मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या प्रयत्नामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.) या निधीमध्ये वाढ करण्यात येईल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

…पण डोळ्यांना ते कधी जमलचं नाही; रिंकू राजगुरुच्या शायरीने चाहते घायाळ

दलित पॅथरने आम्हाला काय दिले…….

ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे निधन

डिजिटल माध्यमांसाठी केंद्राचे जे निकष आहेत. ते तपासून त्या धर्तीवर डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले जाईल, अशी घोषणा ही मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली. पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या डिसेंबर पर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. पत्रकारांचे प्रश्न पोटतिडकीने उपस्थित करणाऱ्या सर्व विधान परिषद सदस्य, मंत्री शंभूराज देसाई आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि प्रवीण पुरो यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी