30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना भवनात कोरोनाची एन्ट्री, सेना भवन बंद!

शिवसेना भवनात कोरोनाची एन्ट्री, सेना भवन बंद!

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना भवनात एक कोरोनाग्रस्त शिवसैनिक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या लढाईमध्ये शिवसैनिकांची टीम दिवसरात्र काम करत आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना भवनात येणा-या जाणा-या कार्यकर्त्यांची पदाधिका-यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. “शिवसैनिक करोनाशी लढण्यासाठी मदतकार्य करत असतात व त्यासाठी अनेकांच्या संपर्कात येतात, त्यामुळेच एका शिवसैनिकाला करोनाची लागण झाला असावा अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येत आहे. असं शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी संबंधित शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी