29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात

टीम लय भारी

मुंबई : सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने  वांद्रे येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या रुग्णालयात त्यांनी कोविड १९ ची चाचणीही करण्यात आली. मात्र या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती समोर आली आहे.

कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने  वांद्रे येथील  गुरु नानक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सरोज खान यांचा कोविडचा रिपोर्टही निगेटिव्ह आल्यामुळे कोणतीही भीती नाही. दोन तीन दिवसात डिस्चार्जही मिळण्याची शक्यता आहे. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या नृत्य दिग्दर्शिका आहेत. डिंग डाँग डिंग.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं आहे. २०१९ मध्ये आलेल्या कलंक या सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफीही त्यांनी केली आहे. सरोज खान यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या कुटुंबियांना मोठी चिंता होती. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्यामुळे लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी