30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeआरोग्य'नॅशनल क्रश' Smriti Mandhana चा फिटनेस फंडा घ्या जाणून

‘नॅशनल क्रश’ Smriti Mandhana चा फिटनेस फंडा घ्या जाणून

भारतीय संघातील सलामीची स्फोटक बॅटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने क्रिकेट जगतात आपली एक विशेष छाप सोडलीये. वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने जिंकले. त्यामुळे सध्या सर्वत्र स्मृती मानधनाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. स्मृती केवळं खेळामुळेंच चर्चेत नसते तर ती वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. जगभरात स्मृतीची ओळख नॅशनल क्रश अशीही आहे. अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या फिटनेसबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. तर जाणून घेऊयात तिचा फिटनेस फंडा...(Smriti Mandhana Fitness Journey)

भारतीय संघातील सलामीची स्फोटक बॅटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने क्रिकेट जगतात आपली एक विशेष छाप सोडलीये. वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने जिंकले. त्यामुळे सध्या सर्वत्र स्मृती मानधनाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. स्मृती केवळं खेळामुळेंच चर्चेत नसते तर ती वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. जगभरात स्मृतीची ओळख नॅशनल क्रश अशीही आहे. अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या फिटनेसबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. तर जाणून घेऊयात तिचा फिटनेस फंडा…(Smriti Mandhana Fitness Journey)

वेगवेगळ्या एक्सरसाईजसह स्मृती स्वत:चा फिटनेस सुधारण्यावर भर देते. नियमित योगासन हे देखील तिच्या फिटनेसमागचे एक रहस्य आहे.

ध्यान करण्यावर अधिक भर देते

ध्यान हे योगातील महत्त्वाचे अंग आहे. अस्वस्थ मनाला शांत करण्याची गोष्ट यातून साध्य होते. ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे. डोळे बंद करु आपल्याला फक्त नैसर्गिक श्वास घ्यायचा आहे. यामुळे आत्मशक्‍ती आणि ऊर्जा जपण्यास मदत मिळते. एखाद्या खेळाडूसाठी याचे खास फायदे मिळतात. अपेक्षांचे ओझे असताना येणारा दबाव आणि मनावरील ताण कमी करण्यासाठी कोणत्याही खेळाडूला याचा फायदा मिळू शकते. स्मृती मानधना यावरही फोकस करते.

स्मृती मानधना योगाशिवाय दररोज किमान अर्धा तास कार्डिओ वर्कआउट करते. हा तिच्या वर्कआउट रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आहराविषयी…

मारवाडी कुटुंबातून आलेल्या स्मृतीच्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थांबरोबरच अंडी आणि शाकाहारी जेवणाचाही समावेश असतो. खेळाडूंच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असणं आवश्यक असलं तरीदेखील मांसाहाराचा वासही तिला सहन होत नसल्याने ते ती वर्ज्य करते.

सुकामेव्यासह सोयायुक्त पदार्थदेखील ती आहारात घेते. इतकंच नाही तर “दिलसे शाकाहारी” असलेली स्मृती हिरव्यागार भाज्यांचा समावेश सलाडमध्ये कच्च्या स्वरूपात तसंच करीच्या रूपात करतेच करते. ताज्या आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या, फळे खाण्याला स्मृती प्राधान्य देते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी