33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमनोरंजन'चला हवा येऊ द्या' संपल्यानांतर भावुक झाला कुशल बद्रिके, व्हिडिओ पोस्ट करत...

‘चला हवा येऊ द्या’ संपल्यानांतर भावुक झाला कुशल बद्रिके, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला…

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय असलेल्या 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शो ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सतत 10 वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा शो संपल्यानांतर या टीमचा एक अविभाज्य भाग असलेल्या कुशल बद्रिके (Kushal Badrike Video) याने एक भावुक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या विनोदीबुद्धीने अचुक टायमिंगने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.(Kushal Badrike Video From Chala Hawa Yeu Dya)

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शो ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सतत 10 वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा शो संपल्यानांतर या टीमचा एक अविभाज्य भाग असलेल्या कुशल बद्रिके (Kushal Badrike Video) याने एक भावुक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या विनोदीबुद्धीने अचुक टायमिंगने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. (Kushal Badrike Video From Chala Hawa Yeu Dya)

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. याचबरोबर अनेक नवोदित कलाकारांना ही त्यांचा टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. या शो मध्ये मराठी सिलेब्रिटींबरोबर बॉलीवूडचे काही मोठे कलाकार देखील झळकले होते. मात्र या लोकप्रिय शोने निरोप घेतल्याने प्रेक्षक नाराज आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आता शो संपल्यानंतर कुशल भावुक झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरील एक व्हिडिओ शेअर केला आहे.हा व्हिडिओ शेअर करत त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले की, “माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार. चूक भूल द्यावी घ्यावी,”

सोशल मीडिया वर आता कुशलची पोस्ट वायरल होत आहे . त्यांचे चाहते पोस्टवर कमेंट करत आहेत. तर संतोष जुवेकरनेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. “तुम्ही परत येणार सगळे नवीन रूपात नवीन जोमात. पुराना जायेगा तभी तो नया आयेगा. Love u all आणि खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप हसवून हसवून आठवणी आणि खळखळते हसण्याचे क्षण आम्हाला दिले आहेत,” असं त्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी