29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रTiger : सावधान ! पश्चिम महाराष्ट्रात 'पट्टेरी' वाघांचा वावर वाढलाय.....

Tiger : सावधान ! पश्चिम महाराष्ट्रात ‘पट्टेरी’ वाघांचा वावर वाढलाय…..

महाराष्‍ट्रात बिबटयांचा (Leopards) वावर खूप मोठयाप्रमाणात वाढला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पट्टेरी वाघांचा (Tiger) वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात या बिबटयांची छबी ट‍िपण्यात आली आहे.

महाराष्‍ट्रात बिबटयांचा (Leopards) वावर खूप मोठयाप्रमाणात वाढला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पट्टेरी वाघांचा (Tiger) वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात या बिबटयांची छबी ट‍िपण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या जंगलांमध्ये पट्टेरी वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे वाघ गोव्यामधील म्हादेई अभयारण्य तसेच कर्नाटकमधील काली भीमगड वन्यजीव अभयारण्यातून येतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात त्यांचा वावर वाढला आहे. पट्टेरी वाघ हे कोल्हापूरमधील राधानगरीच्या द‍िशेने जातात. वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी कोल्हापूर वनव‍िभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टने ट्रॅप कॅमेरा बसवला होता. त्यामध्ये या वाघांच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. सुमारे 20 ठिकाणी हे कॅमेरे बसव‍िण्यात आले आहेत.  या मध्ये गेल्या सहा महिन्यांतील हालचाली ट‍िपल्या आहेत. कोल्हापूर कॉरिडॉरमध्ये आठ वाघ दिसून आले.

या परिसरात नर आणि मादी वाघांची एक जोडी पूर्वी दिसली होती. शिवाय काही वाघ (Tiger) असल्याचे स्थान‍िक सांगतता. आता त्यांची प‍िल्ले वाढली असण्याची शक्यता आहे. अनेक वेळा हे वाघ शेतकऱ्यांच्या गोठयातील जनावरांवर हल्ला करतात. तशा तक्रारी देखील यापूर्वी वनविभागाकडे केल्या होत्या. कोल्हापूर हे संस्थान शाहू महाराजांकडे होते. त्यावेळी या परिसरात च‍ित्ते देखील होते, असे इतिहासात उल्लेख आहेत. हा परिसर वन्यजीवांसाठी उत्तम असल्याने वाघांचा वावर या ठिकाणी वाढला आहे. या परिसरात त्यांना खाण्यासाठी अनेक प्रकारचे प्राणी आहेत. हरीण, काळवीट, ससे, कोल्हे, निलगाय अशा प्राण्यांची ते शिकार करतात.

हे सुद्धा वाचा

Congress party : काँग्रेस पक्षाच्या जुलबंदीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचे मौन

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेन मुंबईकरांच्या सेवेसाठी उद्यापासून सज्ज

महाराष्ट्रात विदर्भात पट्टेरी वाघांची संख्या खूप आहे. ताडोबा, नागझरी हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वाघांची शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनविभागाल डोळयात तेल घालून या प्राण्यांचे रक्षण करावे लागते. तसेच वाघांची संख्या वाढली तरी देखील अजूबाजूच्या गावांत शिरुन ते हल्ले करु शकतात. त्यामुळे वाघ आणि मानव हा संघर्ष निर्माण होतो. त्याचा समन्वय साधणे ही एक तारेवरची कसरत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी