30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रShetkari Samvad Yatra : शहाजी बापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंना तुफान प्रतिसाद

Shetkari Samvad Yatra : शहाजी बापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंना तुफान प्रतिसाद

काय डोंगार, काय झाडी.... या डायलॉगमुळे प्रसिध्द झालेले सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदार संघात आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकरी संवाद यात्रेनिमित्त आले आहेत.

काय डोंगार, काय झाडी…. या डायलॉगमुळे प्रसिध्द झालेले सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदार संघात आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकरी संवाद यात्रेनिमित्त आले आहेत. राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची शेतकरी संवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

याबाबत त्यांनी ट्विटरवर दौऱ्याबाबत फोटो आणि दौऱ्याबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आज सोलापूर शहरात शिवसैनिकांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी दौऱ्याला सुरूवात केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महात्मा बसवेश्वर चौक, (ता.उत्तर सोलापूर येथे शिवसेनेच्या देगांव शाखेच्या नवीन वास्तूचे उदघाटन केले. इथल्या शिवसैनिकांसोबत संवाद साधला. ग्रामीण भाग असो वा शहरीभाग, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना नेहमी प्रयत्नशील आहे.
त्यानंतर त्यांनी सांगोला मतदार संघात पाहणी दौऱ्याचे देखील फोटो त्यांनी ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी संगेवाडी येथे नुकसानग्रस्त सूर्यफूल पीकाची पहाणी केल्याचे फोटो शेअर करत तसेच तहसीलदार, कृषीअधिकारी यांच्यासोबत संवाद साधून परिस्थितीचा अंदाज घेतला असल्याचे म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतातील पीक कुजून गेलयं अश्या परिस्थितीतही शेतकरी बांधवांना मदत मिळाली नाहीये, इथला शेतकरी बेभरवशी सरकारमुळे पिचला गेलाय. डाळिंबाची खाण असलेल्या सांगोला तालुक्यातील मांजरी गावात आज शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. डाळिंबावरील ‘मर’ रोगाने शेतकरी त्रस्त आहेत. निवेदनाद्वारे अनेक समस्या बळीराजा माझ्याजवळ मांडत आहेत. या शेतकऱ्यांना शिवसेनाच न्याय मिळवून देणार, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढणार!

 

तसेच आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय माजी आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील रोटरी स्मृतीवनाला भेट दिल्याचे फोटो देखील त्यांनी ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, विधानसभेत सर्वाधिक ११ वेळा निवडून जाऊन आबांनी केलेली कामगिरी आणि निस्वार्थीपणे केलेली लोकसेवा समाजकारणातील प्रत्येकासाठी आदर्श वस्तूपाठ आहे.
हे सुद्धा वाचा :
Deepali Sayyad : ‘उद्धवां’ची साथ सोडत दीपाली सय्यद ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’

Sanjay Raut : 101 दिवसांचा वनवास संपला! संजय राऊतांना जामीन मंजूर

PM Narendra Modi : पाकिस्तानातील राजकिय पेचप्रसंगासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार! पीटीआयचा आरोप

शिंदे गटासोबत गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी शेतकरी संवाद यात्रे दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला या संवाद यात्रेला शेतकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला, शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच लढत राहणार असल्याची ग्वाही देखील दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी