27 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रधडपड : दारुसाठी, तर कुठे बँकेतून पैसे काढण्यासाठी!

धडपड : दारुसाठी, तर कुठे बँकेतून पैसे काढण्यासाठी!

अजित जगताप : टीम लय भारी 

सातारा : कोरोनाच्या हाहाकारामुळे लॉकडाऊन सुरु आहे. नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र साता-यात आज वेगळचं चित्र दिसून आलं. एका ठिकाणी दारु खरेदीसाठी रांगा होत्या, तर दुसरीकडे बॅंकेतून पैसे काढून उदरनिर्वाह चालवण्याची कसरत सुरु होती.

सध्या देशभर लॉकडाऊन 3.0 सुरु आहे. 18 तारखेला लॉकडाऊन 4.0 सुरु होईल. सातारा जिल्ह्यातील काही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. केंद्राच्या निर्णयानंतर  दारुची दुकाने सुरु झाली आहेत. प्रथमच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. काहींनी रांगा लावून दारू विकत घेतली तर काहींनी पार्सल आणण्यासाठी आपल्या माणसांना दुकानासमोर लाईनीत उभ केलं होतं असं चित्र दिसून आलं. दारू पिऊन सातारा बसस्थानक समोरील एका गाळ्यात, शहरातील काही भागात दारू ढोसून गोंधळ घातला.  दारूच्या दुकाना समोर उभे राहणारे लोक अगतिक पणे आपला काउंटर पर्यंत नंबर केव्हा येतो? याची वाट पाहत होते. बाकी इतर जण आपापल्या माल घेतला का? याची लांबूनच टेहळणी करीत होते.

मात्र, दुसऱ्या बाजूला वेगळं चित्र होतं. संसार चालवण्यासाठी व पोट भरण्यासाठी किती कसर करावी लागते याचा प्रत्यय आला.  संसारासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी बँका समोर खात्यातील पैसे काढण्यासाठी नागरिक लांब रांगांमध्ये उभे राहिले होते. भाजीपाला, किराणा, नारळ, फ्रुटस् इत्यादी खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. साताऱ्यात दारू दुकाने बंद करण्यासाठी आता न्यायालयात धाव घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे व इतर नागरिकांनी व्यक्त केली.

आज साताऱ्यात  दारू दुकाने व ग्राहक यांच्यावर लक्ष केंद्रित केले असले तरी साताऱ्यातील विसावा नाका, रुग्णालय परिसर व पदपथावर नारळ पाणी पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांची ही गर्दी लक्षणीय होती. दारु पेक्षा ही संसार महत्वाचा आहे याची जाणीव ठेवणाऱ्या साताऱ्यातील   निर्व्यसनी लोकांची धडपड जिद्द व प्रेरणादायी ठरली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी