30 C
Mumbai
Tuesday, January 30, 2024
Homeमहाराष्ट्रआगामी निवडणुकीत सुपर गद्दार, निर्लज्ज पुरंदरच्या बापूला गाडायलाच हवे !

आगामी निवडणुकीत सुपर गद्दार, निर्लज्ज पुरंदरच्या बापूला गाडायलाच हवे !

◆︎ उद्धव ठाकरे यांच्या आतेबहीण कीर्ति फाटक यांनी शिंदे सेनेच्या विजय शिवतारेंना फटकारले; म्हणाल्या, या बापूने घरच्याच महिलेला फसविले, याने पत्नी असूनही आणखी तीन बायका केल्या आहेत. ◆︎ तत्पूर्वी, पुरंदरचे शिवतारे बापू यांनी, "मीच पेरले होते एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज," अशी वल्गना करत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सुरुवातीपासूनच काड्या कोरल्या जात होत्या, अशी कबुलीच देऊन टाकली होती.

‘आगामी निवडणुकीत सुपर गद्दार, निर्लज्ज पुरंदरच्या बापूला गाडायलाच हवे,’ हा संताप आहे उद्धव ठाकरे यांच्या आतेबहीण कीर्ति फाटक यांचा. सासवडमधील जाहीर सभेत अकलेचे तारे तोंडणारे शिंदे सेनेचे नेते विजय शिवतारे यांना त्यांनी चांगलेच फटकारले. (Super Gaddar Nirlajj Purandar Bapu) पुरंदरचे शिवतारे बापू यांनी जाहीर सभेत, “मीच पेरले होते एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज,” असे म्हटले होते. अशी वल्गना करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सुरुवातीपासूनच काड्या कोरल्या जात होत्या, अशी कबुलीच देऊन टाकली होती.

2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकार स्थापन होताच नंदनवन बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उठावाचे बीजरोपण केल्याचे शिवतारे यांनी सभेत सांगितले होते. महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या हिताचे नाही. ते पाडायलाच हवे, हा कट पहिल्या दोन महिन्यातच शिजू लागल्याची कबुलीच शिवतारे यांनी दिली. राज्यात भाजपचे सरकार आणायला हवे, अशी आयडिया शिवतारे यांनीच शिंदेंच्या डोक्यात घुसविली होती, असा दावा त्यांनी केला. सासवडमधील त्यांच्या सभेचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. शिंदे यांना आयडिया देणारे शिवतारे हे चर्चेचा विषय ठरले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या आतेबहीण असलेल्या कीर्ति फाटक या शिवतारे यांच्या या दाव्यावरूनच संतप्त झाल्या. एबीपी माझा या न्यूज चॅनेलला प्रतिक्रिया देताना फाटक यांनी किर्ती फाटक यांनी आगामी निवडणुकीत पुरंदरच्या बापूला गाडण्याची भाषा केली. कीर्ति फाटक या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धाकट्या भगिनीच्या कन्या आहेत. त्या शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस आहेत. आठवडाभरापूर्वीच त्यांनी सांगलीतील मिरजमध्ये, भाजपने भुंकण्यासाठी श्वान पथकाची नियुक्ती केल्याची टीका केली होती. यातील एक कुत्रा कोंकणात भुंकतो तर दूसरा मुंबईत भुंकत असतो, असे त्या म्हणाल्या होत्या. या सगळ्यांचा रिमोट कंट्रोल दिल्लीत असून सांगितले जाईल तसे कथानकानुसार हे श्वानपथक भुंकत असते, अशा खरमरीत शब्दात कीर्ति फाटक यांनी शिंदे सेनेवर निशाणा साधला होता. या लोकांना स्वाभिमान माहिती नसून त्यांच्या कपाळावर गद्दार शब्द कायमचा कोराळा गेला आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. त्यांचे मोठे मामेभाऊ जयदेव ठाकरे हे पत्नी स्मिता ठाकरे यांच्यासह शिंदे सेनेच्या मेळाव्यात पोहोचले होते, तेव्हाही कीर्ति फाटक चांगल्याच संतापल्या होत्या. बाळासाहेबांना कायम मनस्ताप देणाऱ्या व्यक्तींना तुम्ही मंचावर स्थान देऊन काय साधत आहात, असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदेंना केला होता.

यावेळी कीर्ति फाटक यांनी पुरंदरचे विजय शिवतारे यांची पिसे उपटली आहेत. त्या म्हणाल्या, की बापू हा शब्द आपल्याकडे आदराने म्हटला जातो. बापू म्हटल्यावर देशाचे बापू समोर उभे राहतात. गांरबीचा बापू अशी पूर्वी एक गाजलेली कादंबरीही होती. या बापूने मात्र घरच्याच महिलेला फसविले, याने पत्नी असूनही आणखी तीन बायका केल्या आहेत. अश या बापूने आज गद्दारीच्या कटाची, उद्धव यांच्याविरोधात गुन्ह्याची कबुलीच दिली आहे. या गद्दाराला काय म्हणायचे नेमके? हा बापू फारच घातक आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या बापूला गाडलाच पाहिजे.

हे सुद्धा वाचा :

रोहित पवारांकडून भाजप नेत्यांना बारामतीचं आवतणं

काय त्या स्टोऱ्या, काय त्या फोकनाड्या, काय ती गरीबी, एकदमच वोक्केमंदी; शिंदेगटाविरोधात नरकेंचा हल्लाबोल

भाजपला एकनाथ शिंदे नकोसे

कीर्ति फाटक म्हणाल्या, “आतापर्यंत सर्वजण फक्त गद्दार-गद्दार असे म्हणायचे. आता मी आज यांच्यातला सुपर गद्दार बघितला. त्याने स्वत:च आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही गद्दारी करून जणू आपण खूप काही महान काम केल्याचा तो आव आणत होता. गांरबीचा बापू अशी एक कांदबरी पूर्वी गाजली होती. गारंबी या कोकणातल्या एका गावातील ही कथा. बापू हा या कादंबरीचा नायक. त्याच्या प्रेमकथेवर आधारलेली ही कांदबरी होती. मात्र, गांरबीचा बापूमधील नायक सामाजिक भान जपणारा होता. वैचारिक आणि सामाजिक क्रांती घडवून आणणारी ती कांदबरी होती. त्यामुळे आजही बापू म्हटले की मराठी माणसांच्या नजरेसमोर चटकन गारंबीचा बाजू येतो. सध्या मात्र आपल्याकडे पुरंदरचा एक निर्लज्ज बापू आहे. त्यांने आज स्वत:च आपल्या पापाची कबुली दिली आहे.”

Super Gaddar Nirlajj Purandar Bapu, Keerti Fatak Slams Vijay Shivtare, Uddhav Thakres Sister Keerti Fatak

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी