28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीय'काय त्या स्टोऱ्या, काय त्या फोकनाड्या, काय ती गरीबी, एकदमच वोक्केमंदी!' शिंदेगटाविरोधात...

‘काय त्या स्टोऱ्या, काय त्या फोकनाड्या, काय ती गरीबी, एकदमच वोक्केमंदी!’ शिंदेगटाविरोधात नरकेंचा हल्लाबोल

टीम लय भारी

पुणे :तुम्ही कफल्लक आहात तर तुमच्या गावात 2 हेलिपॅड पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशी उगवली काय”, अशी जोरदार टीका करत प्रा. हरि नरके यांनी शिंदे गटाला फटकारले आहे. ‘आम्ही किती बिचारे’, ‘आमच्यावर मोठा अन्याय’ अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या बंडखोर आमदारांचे प्रा. नरके यांनी सोशल मिडीयावर वेगवेगळ्या उदाहरणांदाखल पितळ उघडे पाडले आहे.

प्रा. हरि नरके यांनी ओळीने वेगवेगळ्या मुद्यांचा आधार घेत ट्विट केले आहे. प्रा. नरके ट्विटमध्ये लिहितात, “नवे मुख्यमंत्री दररोज नवी स्टोरी सांगतात. 50 लोक बलाढ्य सत्ता सोडून, त्याग करून माझ्यासोबत आले ही जागतिक क्रांती आहे. मी फाटका माणूस. माझ्याकडे काहीही नसताना हे लोक आले. ते ताकदवरना सोडून आले, त्यांच्याकडे सगळे काही होते. तरीही लोक स्वखुशीने आले.साऱ्या जगाने याची नोंद घेतली, असे नरके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे म्हणणे जसेच्या तसे सुरुवातीला मांडले आहे.

पुढे प्रा. नरके लिहितात , “हो, तुम्हीच सांगत होता ना, गुवाहाटीमध्ये आपल्या सोबत्यांना, “आपल्यामागे एक बलाढ्य महासत्ता आहे. जिने पाकिस्तानला धडा शिकवलाय. तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही असा त्यांनी आपल्याला शब्द दिलाय.” या दोन्हीतले खरे कोणते? तुमच्याकडे काहीच नव्हते तर सुरत ते गुवाहाटी,तिथून गोवा- तिकडून मुंबई ही स्वतंत्र विमाने फुकट आली का? असा सवाल करीत खोटेपणाचा आव आणणाऱ्या शिंदेगटाला चांगलेच धारेवर धरले आहे.

हाच प्रश्न कायम ठेवत हरि नरके म्हणतात, पंचतारांकित संपूर्ण हॉटेल्स सुरत, गुवाहाटी,गोवा नी मुंबईत मोफत मिळाली होती? प्रत्येकाला भेट दिलेली 50 खोकी ते 125 खोकी मिठाईची होती? तुम्ही एकटे नी कफल्लक होता तर गुजरात, आसाम, गोवा नी केंद्र सरकार तुमच्यापुढे कुर्निसात का करीत होते?

“त्यांच्या सगळ्या यंत्रणा तुमच्यापुढे पायघड्या का घालत होत्या? तुम्ही कफल्लक आहात तर तुमच्या गावात 2 हेलिपॅड पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशी उगवली काय? निवडणूक प्रतिज्ञापत्रात तुम्ही कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे, ती रिक्षा चालवून आली काहो असा मिश्किल पण काहीसा तिखट टोला नरके यांनी यावेळी लगावला.

“50 जण सत्ता सोडून आले की महासत्तेसाठी आले? त्याग करून आले की आजवरची कमाई इडीपासून वाचवण्यासाठी आले? हिंदुत्वासाठी आले की देना बँकेसाठी आले? आपली व बापूंची गरिबीची दररोज नवी कथा ऐकून आम्ही सद्गदित होतोय.काय त्या स्टोऱ्या,काय त्या फोकनाड्या,काय ती गरिबी.एकदमच वोक्केमंदी! असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करीत प्रा. हरि नरके यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या खोटेपणाचा बुरखा फाडून जनतेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

हे सुद्धा वाचा…

मुंबईला आज पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’, विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा ‘इन अॅक्शन’ मोडमध्ये

विकास कामांची ऐसीतैसी, मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा घेणार बदला?

“माळशेज घाट एक रमणीय सृष्टी सौंदर्याचा खजीना”

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!