27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रइंदुरीकर महाराजांना पुत्रप्राप्तीसंदर्भातील 'ते' विधान भोवणार; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

इंदुरीकर महाराजांना पुत्रप्राप्तीसंदर्भातील ‘ते’ विधान भोवणार; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

प्रसिद्ध किर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पुत्रप्राप्तीसंदर्भात केलेल्या एका वक्तव्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने इंदुरीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाराजांवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. इंदुरीकर महाराज किर्तनासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. एका किर्तनात बोलताना त्यांनी पुत्रप्राप्तीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत.

इंदुरीकर महाराजांनी शिर्डी येथील ओझरमध्ये किर्तन करताना सम तारखेला स्त्रींसंग झाल्यास मुलगा होतो, आणि विषम तिथीला केला तर मुलगी होते असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराजांवर टीकेची झोड उठली होती. महाराजांनी गर्भलिंग निदान निवडीबाबतची जाहिरात केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा (पीसीपीएनडीटी) सल्लागार समितीने त्यांना नोटीस देखील पाठविण्यात आली होती. तसेच महाराजांवर गु्न्हा दाखल करवा अशी मागणी करणारी एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराजांवर प्रथमवर्ग न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने तो आदेश रद्द केला होता. त्यानंतर अॅड. रंजना गंवांदे यांनी ॲड. जितेंद्र पाटील व ॲड. नेहा कांबळे यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. औरंगाबाद खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत प्रथमवर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत खटला निकाली काढला होता.

हे सुद्धा वाचा

IIT मध्ये निवड झालेल्या हंसिकाने प्रियकरासोबत किडनॅपिंगचा केला बनाव; वडिलांकडे मागितली 10 लाखांची खंडणी

पेशवे हे दुष्ट, नीच प्रवृत्तीचे होते; भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य, समाज माध्यमात नेमाडे यांच्यावर टीका

अजित पवार पत्रकारांना म्हणाले तुम्हाला उद्योग नाही, थांबा जरा आता माझं ऐका  

त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाविरोधात हभप इंदुरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवत इंदुरीकरांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे हभप इंदुरीकर महाराजांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी