29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रSupriya Sule : 'भारतीय जनता पक्ष लाँड्री झालाय!' सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

Supriya Sule : ‘भारतीय जनता पक्ष लाँड्री झालाय!’ सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

राष्ट्रवादी कांग्रेसच्या बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपत गेल्यावर प्रत्येकजण स्वच्छ कसा काय होते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सध्याच्या राजकारणात एकमेकांवर टीका करण्याचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वी झालेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यानंतर कांग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. अशांतच आता राष्ट्रवादी कांग्रेसच्या बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपत गेल्यावर प्रत्येकजण स्वच्छ कसा काय होते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप आधी पक्ष होता मात्र आता लाँड्री’ झालीय अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली पुण्यात बोलत असताना त्या म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांकडे बोलायला आता काही राहिले नाही म्हणून त्यांची आता दडपशाही सुरू आहे. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही असही त्या म्हणाल्या.

भाजपाने आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी नात्यात कविता नव्हती असेही त्या म्हणाल्या भाजपामध्ये आता असलेले नेते हे त्यांचे नेते नाहीयेत तर बाहेरच्या पक्षामधून आलेले नेते आहेत. ज्या नेत्यानी पक्षाला वाढवलं संघटना मजबूत केली अगदी पक्षाची छोटी छोटी कामे केली ते कार्यकर्ते आज कुठे आहेत परंतु त्यांच्या जागी आमच्या पक्षातून किंवा शिवसेनेतुन पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत त्यांना भाजपमध्ये एवढा मान सन्मान मिळत आहे पाहून बरं वाटलं .त्यांच्यात आणि आमच्यात अनेक वर्षांपासून वैचारिक मतभेद होते. मात्र नात्यांमध्ये कटूता नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.भाजपमध्ये त्यांचे खरे नेते नाहीत तर बाहेरच्या पक्षातून आलेले नेतेच अधिक आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या अनेक व्यासपीठावर तेच दिसतात. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षातून अनेक बडे नेते भारतीय जनता पक्षात गेले. त्यांना पक्षाने मोठी संधी दिली असं म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार देखील मानले आहेत.

हे सुद्धा वाचा

Journalism Reality Check : मेनस्ट्रीम मीडियामध्ये दलितांना नगण्य स्थान!

Anil Gote : राष्ट्रवादीच्या अनिल गोटेंकडून देवेंद्र फडणविसांना ढेकणाची उपमा

TV Actress Vaishali Thakkar Suicide : घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीची आत्महत्या! इंस्टाग्राममार्फत 5 दिवसांपूर्वीच दिले होते संकेत

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना आणि कांग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने भाजप आणि एकनाथ शिंदेगटाने स्थापन केलेल्या सरकारवर निशाणा साधण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळेच तिन्ही पक्षातील सर्वच नेते एकत्र सरकारवर टीका करत आहेत. अशावेळी विरोधकांनी केलेल्या टीकांना वेळोवेळी प्रत्येत्तर द्यायला सरकारमधील आमदारही कुठेही कमी पडताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूक 2 वर्षे दूर असली तरी आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकिय परिस्थिती तापलेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी