30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार

टीम लय भारी

मुंबई :- मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण (Reservations) देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संपप्त प्रतिक्रिया उमटली होती. आरक्षणाच्या (Reservations) मुद्द्यावरून राज्यातील राजकारण ही तापताना दिसले आहे. ठाकरे सरकारने राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे (The Thackeray government has decided to give 10 per cent reservation to Maratha students and candidates in the state).

शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार 10% आरक्षणाचा (Reservations) लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार आरक्षणाचा (Reservations) 10% लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारने (State Government) शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे (It has been decided to give 10% EWS reservation to Maratha students and eligible candidates for jobs in the state).

चंद्रकांत पाटलांच्या मागणीला रोहित पवारांचे चोख प्रतिउत्तर

आरक्षणाबाबत भाजप दुतोंडी चेहऱ्याने वावरत आहे ; नवाब मलिक

UP: Six bodies of suspected Covid patients found floating in Ganga river in Fatehpur district

राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाजातील काही संघटनांकडून ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करुन राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण (Reservations) देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के EWS आरक्षणाचा (Reservations) लाभ घेता येईल. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात आणि नोकरीमध्ये ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षणाचा (Reservations) लाभ मराठा युवकांना मिळणार आहे.

मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न

ठाकरे सरकारने (Thackeray government) मराठा समाजातील युवकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये ईडब्ल्यूएसचा लाभ घेण्याबाबत शासननिर्यण काढला आहे. या आदेशामुळे सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार EWS आरक्षणाचा (Reservations) 10% लाभ घेऊ शकतात. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा (State Government) प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. राज्यात मराठा आरक्षण (Maratha reservation) लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा (Reservations) फायदा घेता येत नव्हता तसा निर्णय सरकारने घेतला होता. आता मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण (Reservations) लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास एसईबीसीचा लाभ मिळणार नाही

राज्य सरकारने (State Government) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता मराठा समाजातील युवकांना देखील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण (Reservations) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थी व उमेदवार शिक्षण आणि नोकरीमध्ये या आरक्षणाचा (Reservations) लाभ घेऊ शकतात. हा लाभ घ्यावा की नाही हे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या भूमिकेकडे लक्ष

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केल्यानंतर मराठा समाजाच्या संघटनांचे नेते आक्रमक झाले होते. काही संघटनांनी मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न सुटेपर्यंत ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण (Reservations) द्यावे, अशी मागणी केली होती. त्यामागणीनुसार राज्य सरकारने (State Government) निर्णय घेतला आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मंडळी सरकारच्या या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी