33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रया तीन लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे ४५० उमेदवार ....

या तीन लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे ४५० उमेदवार ….

नाशिक, कळवण, दिंडोरी मतदारसंघात मराठा समाजाचे ४५० हुन अधिक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.बहुतांशी मराठा मतदार मराठा उमेदवारांना मतदान करणार असा ठाम विश्वास सकल मराठा समाजाने व्यक्त केला आहे,तसेच मराठ्यांच्या जीवावर राजकीय खुर्च्या मिळवून मराठ्यांचे ओबीसी तील आरक्षण मिळवून देण्यासाठी गप्प बसलेले आमदार खासदार यांना मराठा समाज आता दारात ही उभ करणार नाही, त्याचे नियोजन आम्ही समाजात करतो आहे, याबद्दल अर्ज भरण्यासाठी नियोजन सुरु केले आहे, मराठा समाजाचे उमेदवार निवडणूक रिंगणात येणार म्हणून नाशिकची लोकसभा निवडणूक देखील त्यामुळे रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही. समाजाची फसवणूक केली. आरक्षणाबाबत अन्याय केला. अशी मराठा समाजाची भावना झाली आहे. या प्रश्नाबाबत सातत्याने विविध आश्वासने देऊन देखील प्रत्यक्षात काहीही कृती करण्यात आलेली नाही. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी प्रामुख्याने समाजाचा राग आहे. त्याचे पडसाद येत्या निवडणुकीमध्ये उमटलेले दिसतील, असे सकल मराठा समाजाचे आंदोलक नाना बच्छाव यांनी सांगितले

नाशिक शहरातील 50 वैद्यकीय व्यावसायिक येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील. मराठवाड्यातून नाशिकमध्ये स्थायिक झालेले 200 हून अधिक नागरिक देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या संदर्भात येत्या दोन दिवसात नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. यावेळी देखील विविध कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. किमान साडेतीनशे जण उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज बच्छाव यांनी व्यक्त केला.

मुंबई आंदोलनात सरकारने मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना वाशी येथे दिले होते. त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सत्तेत बसणाऱ्या मराठा आमदार खासदारांचे अपयश आहे,मराठयांची मते लाटून स्वतःची घरे भरणाऱ्या तसेच समाजाला फसवणाऱ्या ना मराठा कधी उभे ही करणार नाही, त्यासाठीच हे नियोजन आहे,
मराठयाना मुंबईत दिलेले आश्वासन विसरणाऱ्या, तसेच मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या, खोटारड्या सरकारचा व निष्क्रिय लाचार मराठा खासदार आमदार यांना ही त्यांची जागा मराठा समाज दाखवेल,
सरकारचे मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांना अडचणीत आणण्याचे डावपेच आहेत. राज्य शासनाच्या या धोरणाविरुद्ध समाजामध्ये आक्रोश आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यातून मतदान यंत्र ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न असेल.

दरम्यान लोकसभा निवडणुकीची तयारी सकल मराठा समाजाने जोरदार पणे सुरू आहे. विविध राजकीय पक्ष सध्या जागावाटप आणि उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त आहेत. अशा स्थितीत सकल मराठा समाज देखील यानिमित्ताने आरक्षणाची आपली मागणी पुन्हा एकदा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मतदानावर किती प्रभाव पडतो? आरक्षणाचा प्रश्न अजूनही खितपत असतानाही मराठा मतदार कोणाला कौल देतो? मराठा समाज यासाठी जरांगे पाटील यांची सभा घेतो का?याबद्दल उत्सुकता वाढली आहे. नाशिक मतदारसंघात देखील तशी जोरदार तयारी सुरू झाल्याचे सकल मराठा समाजावतीने सांगितले गेले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी