29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव साहेब हा ‘खेकडा’ शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा

उध्दव साहेब हा ‘खेकडा’ शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा

लयभारी न्यूजनेटवर्क

सोलापूर : शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद नाकारल्यामुळे ते पक्षविरोधी कारवाया करत आहेत. सावतांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. या कारणामुळे संतप्त शिवसैनिकांनी “हा खेकडा शिवसेना पोखरत आहे’’, वेळीच नांग्या मोडा, असे फलक सोलापुरात लावले आहेत.

शिवसेनेचे बंडखोर आमदार माजी मंत्री तानाजी सावंत बंडखोरी केल्यामुळे चर्चेत आले आहेत. उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेत बंडखोरी नंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सावंतांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्यांनी मातोश्रीचे आदेश पाळले नाही अशी चर्चा सध्या सुरु आहे. या कारणामुळे सोलापुरातील शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले होते. याच पार्श्वभूमीवर “हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा,” अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी केली आहे. हा बॅनर सोलापुरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे.. वेळीच नांग्या मोडा – निष्ठावंत शिवसैनिक, अशा आशयाचे बॅनर सोलापूरमध्ये लावण्यात आले आहेत. यात तानाजी सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करण्यात आला आहे. सोलापुरातील मेकॅनिक चौक परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपला साथ दिली होती. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांच्या गटातील सात सदस्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली.

सावंतांची बैठकीला दांडी….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या उद्योगाचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला तानाजी सावंत अनुपस्थितीत होते. विशेष अधिवेशनादरम्यानही तानाजी सावंंत गैरहजर होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी