28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमधील या पोस्ट कार्यालयाचा ३५ वर्षांनंतर संपला वनवास

नाशिकमधील या पोस्ट कार्यालयाचा ३५ वर्षांनंतर संपला वनवास

गेल्या ३५ वर्षापासून भाडे तत्त्वाच्या खोलीत पोस्ट ऑफिसचे कामकाज हाकणाऱ्या पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना अखेर स्वतःची अद्यावत इमारत मिळाली आहे. यामुळे स्वतःची इमारत उभी राहावी अशी आशा बाळगून असणाऱ्या पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. सोमवारी (दि.१२) या नूतन वास्तूचे उदघाट्न करण्यात आले असून मंगळवारपासून नियमित कामकाजला सुरुवात होणार आहे.सातपूर कॉलनीतील आरक्षित भूखंडावर खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नाने पोस्ट कार्यालयाची प्रशस्त आणि सर्वसुविधांयुक्त अशी इमारत उभारण्यात आली आहे.या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे,शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते,महानगर प्रमुख बंटी तिदमे,माजी नगरसेवक प्रकाश लोंढे,सलीम शेख,इंदूबाई नागरे,पल्लवी पाटील,सोपान शहाणे,प्रकाश निगळ आदी उपस्थित होते.

नवी मुंबई परिक्षेत्राच्या निदेशक सरण्या यांनी प्रास्तविक केले.अप्पर डाक अधीक्षक प्रल्हाद वाणी यांनी पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे,आमदार सीमा हिरे,माजी नगरसेवक प्रकाश लोंढे,सलीम शेख यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन संदेश बैरागी यांनी केले.स्वागत प्रशांत मालकर यांनी केले. यावेळी एकनाथ बागुल,किसनराव खताळे,बाबाजी सोनवणे,सदाशिव माळी,शंकर पाटील,शरीफ शेख,भगवान सोनवणे,भास्कर सोनवणे, डॉ.गोकुळ अहिरे,फारुखखान पठाण,मनोज अहिरे,भरत त्रिवेदी,बाळासाहेब भोजने,प्रकाश तांबट, सोमनाथ ठाकरे,कल्पेश कांडेकर,सागर निगळ आदिंसह सप्तशृंगी जेष्ठ नागरिक संघ,समतानगर सोसायटी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस कार्यलयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर राजकीय मंडळींचीच जास्त गर्दी जमली होती. यावेळी डझनभर राजकीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडल्याने हा कार्यक्रम शासकीय की राजकीय असा प्रश्न उपस्थितांमध्ये पडला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी