35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रदिल्लीतून उदयनराजेंना ग्रीन सिग्नल? लवकरच अधिकृत घोषणा

दिल्लीतून उदयनराजेंना ग्रीन सिग्नल? लवकरच अधिकृत घोषणा

दिल्लीतून छत्रपती उदयनराजे भोसले यांना Udayanraje Bhosale)  ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघाची महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु खासदार उदयनराजे या मतदारसंघातून भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशातच 

दिल्लीतून छत्रपती उदयनराजे भोसले यांना (Udayanraje Bhosale)  ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघाची महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु खासदार उदयनराजे या मतदारसंघातून भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.  

आरंभ है प्रचंड…, असं वाक्य लिहेलं पोस्टर आज सकाळीच साताऱ्यात झळकलं. यासोबतच, उदयनराजे यांचे फोटो भाजपच्या चिन्हासहित सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेत. दरम्यान, उदयनराजेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून उद्याच घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहितीही रणजीत नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

निंबाळकर यांनी नुकतचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यांच्या भेटीनंतर निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र महायुतीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे फुटणार आहे.’ अशी माहिती निंबाळकर यांनी दिली.

या प्रचाराच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर उपमुख्यमंत्री आपले कुलदैवत असणाऱ्या निरा नरसिंहपूर येथे जावून नरसिंहाचं दर्शन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी