35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यचेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांमुळे त्रस्त असाल, तर आजच ट्राय करा 'हे' उपाय आणि...

चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांमुळे त्रस्त असाल, तर आजच ट्राय करा ‘हे’ उपाय आणि टेन्शन फ्री व्हा

उन्हाळा सुरु झाला आहे. आता सर्वांनाच आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यावी लागेल. कारण हवामानाच्या बदलामुळे आपल्या चेहऱ्यावर लवकर फरक पडतो. काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुम येतात. त्यामुळे चेहऱ्यावर डाग सुद्धा येतात. (Beauty Tips suffering from acne on your face) पण जर तुम्ही मुरुम येण्याआधीच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली तर तुमचा चेहरा खराब होणारनाही नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत,ज्याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येणारच नाही.

उन्हाळा सुरु झाला आहे. आता सर्वांनाच आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यावी लागेल. कारण हवामानाच्या बदलामुळे आपल्या चेहऱ्यावर लवकर फरक पडतो. काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुम येतात. त्यामुळे चेहऱ्यावर डाग सुद्धा येतात. (Beauty Tips suffering from acne on your face) पण जर तुम्ही मुरुम येण्याआधीच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली तर तुमचा चेहरा खराब होणारनाही नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत,ज्याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येणारच नाही.

किशमिशच्या मदतीने घरबसल्या मिळवा चमकदार त्वचा, महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सला करा बाय-बाय

सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या टी-झोनवर जास्त तेल असेल तर तुम्ही काहीही करण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला 2 मिनिटे मसाज करा. यासाठी कोणत्याही प्रकारचे फेशियल तेल वापरू नका. चेहऱ्यावरून निघणाऱ्या नैसर्गिक तेलाने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची मालिश करू शकता. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. पहिला फायदा म्हणजे त्वचेच्या छिद्रांचा आकार कमी होतो, ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जाण्याची शक्यता कमी होते आणि मुरुमांचा धोका देखील कमी होतो. एवढेच नाही तर तुमची त्वचाही घट्ट होते. (Beauty Tips suffering from acne on your face)

चेहरा स्वच्छ करणे, टोनिंग करणे आणि मॉइश्चरायझ करणे प्रत्येक बाबतीत महत्त्वाचे आहे. ऋतू कोणताही असो, तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत त्याचा समावेश केला पाहिजे. बाजारात तुम्हाला अनेक प्रकारची उत्पादने मिळतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरबसल्या तुमच्यासाठी स्किन टोनर बनवू शकता. त्वचेसाठी सर्वोत्तम टोनर म्हणजे गुलाबजल, तर तुम्ही त्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्चे दूध वापरू शकता आणि मॉइश्चरायझिंगसाठी मध हा एक चांगला पर्याय आहे.

सकाळी उठल्यानंतर तुमचे पण केस गुंतात का? मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

फेशियल स्टीम देखील तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय असू शकतो. तुम्हाला नियमित फेशियल स्टीम घेण्याची गरज नाही, परंतु आठवड्यातून एकदा तुम्ही पाणी गरम करून चेहरा वाफ घ्यावा. तुम्ही लिंबाची साले पाण्यात टाकू शकता, यामुळे तुमचा चेहरा खोलवर स्वच्छ होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर चमकही येईल. लक्षात ठेवा की स्टीम घेतल्यावर त्वचेची छिद्रे उघडतात आणि ती पुन्हा बंद करण्यासाठी फेस पॅक वापरावा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे फेस पॅक मिळतील, पण तुम्ही बेसन, तांदूळ, मैदा इत्यादींनीही घरी फेस पॅक बनवू शकता. या सर्वांमध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे त्वचेवर अडकलेला मृत त्वचेचा थर काढला जातो.

कोणत्याही ऋतूमध्ये सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे कारण सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे तुमची त्वचा फक्त टॅन होत नाही तर ती आतून खराबही होते. कधीकधी यामुळे मुरुमांचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन निवडा आणि दिवसातून किमान 3 ते 4 वेळा वापरा.

Health Tips: तुम्हाला पण बॉलीवुड एक्ट्रेस सारखं स्लिम व्हायचं आहे? मग आजच ट्राय करा ‘तूप कॉफी’

जर त्वचा हायड्रेटेड राहिली तर ती खराब होण्याची आणि कोरडी होण्याची शक्यता आपोआप कमी होईल. तुम्ही तुमच्या आहारात शक्य तितक्या पातळ पदार्थांचा वापर करावा. तुम्ही दिवसातून किमान 10 ग्लास पाणी प्यावे. जर त्वचा खूप कोरडी राहिली तर तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर गुलाबपाणी स्प्रे करू शकता. यामुळे तुमची त्वचा फ्रेश राहील.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढायला विसरू नका. याशिवाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन सी असलेली उत्पादने आणि कोरफडीचे जेल वापरू शकता. रात्री झोपताना त्वचेच्या पेशी त्वचेची दुरुस्ती करण्याचे काम करतात आणि व्हिटॅमिन सी त्यांना यामध्ये मदत करते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी