29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रविजय शिवतारेंचा निर्णय पक्का, 'या' दिवशी भरणार फॉर्म; बारामती लोकसभा अपक्ष लढवणार?

विजय शिवतारेंचा निर्णय पक्का, ‘या’ दिवशी भरणार फॉर्म; बारामती लोकसभा अपक्ष लढवणार?

शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अखेर आपला निर्णय पक्का केला. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केल्याचे सांगत अर्ज भरण्याच्या तारिख जाहिर केली. त्यांच्या या घोषणेनंतर शिवतारे (Vijay Shivtare) नक्की कोणाच्या चिन्हावर लढणार? हा प्रश्न उपस्थित होत आहेच. पण दुसरीकडं शिवतारे बारामती लोकसभा अपक्ष लढवणार? असल्याच्या चर्चेने उत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्थी करुनही विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यावर ठाम असून आज इंदापुरमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अखेर आपला निर्णय पक्का केला. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केल्याचे सांगत अर्ज भरण्याच्या तारिख जाहिर केली. त्यांच्या या घोषणेनंतर शिवतारे (Vijay Shivtare) नक्की कोणाच्या चिन्हावर लढणार? हा प्रश्न उपस्थित होत आहेच. पण दुसरीकडं शिवतारे बारामती लोकसभा अपक्ष लढवणार? असल्याच्या चर्चेने उत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्थी करुनही विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यावर ठाम असून आज इंदापुरमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.(Vijay Shivtare final decision baramati lok sabha seat will fill the form on 12 april)

एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुक लढण्यावर ठाम आहेत.

“मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे,” अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय होणारच, असा विश्वासही विजय शिवतारे यांनी यावेळी व्यक्त केला.

काय म्हणाले शिवतारे?

इंदापुरमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. “पवार कुटुंबाने ग्रामीण भागात दहशतवाद निर्माण केला आहे.

हा ग्रामीण दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहेत. मी दोन्ही पवारांविषयी माझ्या सभांमध्ये बोलणार आहे. अजित पवारांनी अनेक लोकांना त्रास दिला आहे. सुप्रिया सुळेंनीही मागील १५ वर्षांत लोकांच्या हिताचं दोन टक्केही काम केलं नाही. असा आरोप शिवतारे यांनी यावेळी केला.

तसेच, ”आम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार पण नको आहेत. गावागावात सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन सांगा विजय शिवतारे ही निवडणूक लढणार आहेत. १ एप्रिलला पुरंदरच्या पालखी तळावर या लढाईचा बिगुल वाजवायचा आहे.

पुरंदरमधील सर्वपक्षीय नेत्यांना एक एप्रिलच्या बैठकीला निमंत्रण देणार असल्याचे,” विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.
यासोबतच, मी १ तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि १२ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याचेही शिवतारेंनी यावेळी सांगितले. तसेच, ही लढाई मला लढू द्या, अशी विनंतीही त्यांनी शिंदे- फडणवीसांना केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी