35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजन'स्वातंत्र्य वीर सावरकर'ला मिळाला वीकेंडचा फायदा, दुसऱ्या दिवशी झाली कमाईत वाढ

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ला मिळाला वीकेंडचा फायदा, दुसऱ्या दिवशी झाली कमाईत वाढ

'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट 22 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा एक चरित्रात्मक चित्रपट असून त्यात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सरासरी प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला तेवढी चांगली ओपनिंग मिळाली नाही, पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाला वीकेंडचा फायदा मिळाला. (Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 2)

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट 22 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा एक चरित्रात्मक चित्रपट असून त्यात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सरासरी प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला तेवढी चांगली ओपनिंग मिळाली नाही, पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाला वीकेंडचा फायदा मिळाला. (Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 2)

अनुराग कश्यप म्हणतोय, ‘मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख द्या’

सैकनिल्कच्या अहवालानुसार, रणदीप हुड्डा (Randeep Hooda) स्टारर चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.05 कोटी रुपये कमवले. दुस-या दिवशी चित्रपटाला विकेंडचा फायदा झाला. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत एकूण 3.30 कोटींची कमाई केली आहे.

22 मार्चला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबरोबर कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला. ‘मडगाव एक्स्प्रेस’ बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत असून ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ला मागे टाकत असल्याचे दिसत आहे. रणदीप हुडाच्या चित्रपटाने दोन दिवसांत 3.30 कोटींची कमाई केली आहे, तर ‘मडगाव एक्सप्रेस’ने 4.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

बिग बींचा लेक लवकरच करणार राजकारणात एन्ट्री; चर्चेला उधाण

तुम्हाला सांगते की, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि सुधारक विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट आहे. वीर सावरकरांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत चांगली कमाई करत असला तरी मराठी भाषेत त्याची फारशी कमाई झाली नाहीये.

एल्विश यादवला कोर्टाने दिला दिलासा, पण तुरुंगातून नाही होणार सुटका, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटात रणदीप हुड्डा सोबत अंकिता लोखंडे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडे यांनी वीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रणदीप नेअभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी