32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसींसाठी शेवटपर्यंत लढा देणार : छगन भुजबळ

ओबीसींसाठी शेवटपर्यंत लढा देणार : छगन भुजबळ

मराठा आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षात वेगवेगल्या भूमिका आहेत. मी गेली ३५  वर्ष ओबीसींसाठी आणि  ३७४  जातींसाठी लढतोय. यापुढेही लढत राहील . बाकी प्रमुख मंडळीनि  निर्णय घ्यावा ज्यांना वाटते त्यांनी मला मदत करावी असे प्रतिपादन  कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मध्ये रविवारी सकाळी झालेल्या पत्रकार  परिषदेत केले.छगन भुजबळ यांनी ,  कालच्या सर्व प्रकरणानंतर राज्यभरातून अनेक ओबीसी, दलित,  मागासवर्गीय,  आदिवासी  बांधवांचे  मला फोन येत आहेत. ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली आहे . आमचे  आरक्षण संपले,  पुढे आमच्या शिक्षण नोकरीचे काय असा प्रश्न  उपस्थित होत आहे.  ग्रामपंचायत,  पंचायत समिती येथे आमचा एक दुसरा उमेदवार निवडून येत होता ते पण आमचे जाणार अशी असुरक्षिततेची भावना ओबीसी मध्ये निर्माण झाली आहे.

 

 

मागच्या दाराने सर्व मराठा समाज आला,  एकीकडे कुणबी सर्टिफिकेट द्यायचे आणि ओबीसीत घ्यायचे , दुसरीकडे न्यायमूर्ती समिती नेमून पिटीशन मध्ये काय करता येईल त्याची कार्यवाही करतील आणि तिसरे म्हणजे राज्यात मराठा  सर्वेक्षण सुरू आहे त्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. मराठा मागासवर्गीय आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला डाटा द्यायचा आहे. गायकवाड आयोगाने जे दिले होते त्यावर सुप्रीम कोर्टाने हे मागास कसे असा सवाल उपस्थित केला होता त्यामुळे ते कसे बरोबर आहे हे दाखवण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे.

 

वेगळे मराठा आरक्षण देण्याला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला सगेसोयरे यांना प्रतिज्ञापत्रावर आरक्षण मिळेल असे मुख्यमंत्री बोलले ते बोलतात आम्ही ऐकतो पण आमचे समाधान होत नाही.  54 लाख नोंदी सापडल्या  पण शिंदे कमिटीचे काम संपले का  ?  सर्वोच्च न्यायालयाच्या  न्यायाधीशांना दोन लाख 80 हजार पगार आहे मात्र यांचा पगार साडेचार लाख कशासाठी असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो असा आरोप केला जातो मात्र धनगर,  माळी , वंजारी , तेली , सुतार,  लोहार, अशा   ३७४  जातींचे नुकसान होऊ नये यासाठी माझा हा प्रयत्न आहे. मराठा समाजाला जिंकल्याचा आनंद आहे पण ओबीसी समाजाला काही संपल्याचा आनंद आहे.

मुंबईमध्ये आम्ही जे लोक ओबीसीसाठी काम करत आहे त्या सर्वांना बोलावलं आहे. तामिळनाडू तसेच इतर ठिकाणी  जसे दहा टक्के आरक्षण वाढवले . त्यांचा आंतरिक हेतू हा असावा जसे महाराष्ट्र मध्ये मराठा , गुजरात मध्ये पटेल,  राजस्थान मध्ये जाट यांना शांत करणे हा असावा . दहा टक्के आरक्षणामध्ये 85 टक्के मराठा समाजाने फायदा घेतला आहे तरी हजारो गाड्यातून गरीब माणसे मुंबईत कशी जातात  असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

वड्डेटीवार  यांना  विरोध नाही

विजय वड्डेटीवार  यांनी जाहीर सभेत जोरदार भाषण करीत पक्ष बाजूला राहू द्या आपण फक्त पिवळ्या झेंड्यासाठी लढू असे सांगितले होते दुसऱ्या दिवशी ते बदलले त्यांच्यावर कोणाचा दबाव आला ते का बदलले हे मला माहीत नाही पण त्यांना माझा कोणताही विरोध नाही.

हट्ट पुरवण्याचे काम सरकार करतय
तुम्ही म्हणाले निजामशाहीच्या नोंदी शोधा त्या शोधल्या. मराठवाड्यामधील नोंदी शोधल्या सर्व महाराष्ट्र मधील नोंदि  शोधल्या मात्र सर्वांना ओबीसी मध्ये घ्या असा हट्ट पुरवण्याचे काम सरकार करत आहे. 54 लाख पेक्षा दुप्पट तिप्पट लोक ओबीसी मध्ये आले तर  ओबिसि समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार हे निश्चित आहे. असे भुजबळ म्हणाले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी