27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रदिवा स्टेशनमध्ये मोटरमनच्या केबिनमध्येच चढून महिलेनेच रोखून धरली लोकल

दिवा स्टेशनमध्ये मोटरमनच्या केबिनमध्येच चढून महिलेनेच रोखून धरली लोकल

दिवा जंक्शनला सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढणे हे मोठेच जिकिरीचे काम असते. कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात तुडुंब भरून येत असल्याने दररोज दाटीवाटी करत दिव्यातील प्रवाशांना प्रवास करावा लागतो. दहा वर्षापूर्वी प्रवाशांनी लोकल सेवा बंद पडली होती तेव्हा रेल्वेने 300 प्रवाशांविरोधात गुन्हे दाखल केले होते. ही घटना अनेकांना आठवत असेल. असे असतानाच बुधवार महिला प्रवाशाच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि तिने मोटरमनच्या केबिनमध्येच चढून लोकल रोखून धरली. आज (9 अगस्त) सकाळी दिवा रेल्वे स्थानकात ही घटना घडली. या प्रकरणी 5 महिला प्रवाशांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की, सकाळी 6.23 ची सीएसएमटी फास्ट लोकल अर्धा तास उशिराने आली, नेहमी प्लॅटफॉर्म 4 वर येणारी हीच लोकल प्लॅटफॉर्म 2 वर आली. आधीच उशीर त्यात प्लॅटफॉर्म बदलला, त्यामुळे लोकलमधील गर्दी वाढली. काही महिला दरवाजात लटकत होत्या. हे सांगण्यासाठी एक महिला मोटरमनच्या केबिनमध्ये चढली. त्यामुळे लोकल 10 मिनिटे थांबली. या महिलेचं म्हणणे हेच होते की, महिला लटकत आहेत थोडा वेळ थांबा. हे बघून आरपीएफ आणि जीआरपी तिथे आले. यावेळेच बाकी प्रवासीही मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अखेर मोटरमनच्या केबिनमधून खाली उतरली आणि लोकल सुटली. या सर्व गोंधळामुळे मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन उशिराने धावत होत्या. मात्र आता कारवाई करण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफने 5 महिलांना ताब्यात घेतलं आहे. या महिला सध्या दिवा स्थानकात जीआरपी ऑफिसमध्ये आहेत. दरम्यान, या महिलांवर कारवाई होऊ नये म्हणून दिवा प्रवासी संघटना प्रयत्न करत आहे.
हसमुख असलेल्या रामदास आठवले यांनी वाढवली शिंदे गटाची चिंता
कोंकणीबहुल दिव्यात कोंकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबाच नाही; प्रवाशांमध्ये नाराजी
मुलाला सेट करायचं आहे आणि जावयाला भेट करायचं आहे, भाजप खासदाराची जळजळीत टीका

मध्य रेल्वेच्या अनेक जंक्शनपैकी एक असलेल्या दिवा परिसरात गेल्या 25 वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले आहे. त्या तुलनेत नागरी सुविधांची आबाळ आहे. असे असताना या रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. डोंबिवलीवरून लोकल भरून येत असल्याने प्रवाशांना गाडीत प्रवेश करणे कठीण जात असते. त्यामुळे अनेकजण दिव्यावरून डोंबिवलीला जात परत उलटा प्रवास करून मुंबईला जाणारी गाडी पकडत असतात. येथूनच मुंबईकडे सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल सोडण्यात यावी यासाठी माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. पण रेल्वे प्रशासनाकडून फलाट रिकामे नसते अशी कारणे दिली गेली आहेत. सध्या या भागाचे खासदार श्रीकांत शिंदे आहेत. आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. तीन इंजिनच्या राज्यातील सरकारने आता दिव्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी दिवा जंक्शनवरून लोकल सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करावी असे या परिसरातील प्रवासांनी ‘लय भारी’ शी बोलताना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी