33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रहसमुख असलेल्या रामदास आठवले यांनी वाढवली शिंदे गटाची चिंता

हसमुख असलेल्या रामदास आठवले यांनी वाढवली शिंदे गटाची चिंता

आपल्या शीघ्र कवितांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, लालूप्रसाद यादव, कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हसून हसून पोट धरायला लावणारे, लोकसभेतील गंभीर वातावरण बदलून टाकणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याच पक्षातील खासदाराची चिंता वाढवली आहे. आठवले हे एकनाथ शिंदे यांना सर्वच बाबतीत ‘सीनियर’ असल्याने हे प्रकरण मोदी, शहा यांच्या कानावर घालण्याचे  प्रयत्न एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत.

रामदास आठवले यांनी 2009 रोजी लोकसभेची निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढवली होती. मात्र, यात त्यांना कॉँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. ही बाब आठवले यांच्या जिव्हारी लागली होती. पण आता त्यांना पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून शिर्डीतून लोकसभा लढण्याची इच्छा आठवलेंनी बोलून दाखवली आहे. पण या मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे आहेत. ते सध्या एकनाथ शिंदे गटात असल्याने त्यांना तिकीट मिळवून देण्यापासून निवडून आणण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर येऊन पडलेली आहे. नुकत्याच आलेल्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा सुपडा साफ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री शिंदे यांचे खासदार पुत्र मैदानात उतरले आहेत. असे असताना रामदास आठवले यांनी आपला मतदारसंघ निश्चित करत 2024 ची लोकसभा निवडणूक आपण शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा केल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची धडधड वाढली आहे.

रामदास आठवले यांनी 2009 साली लोकसभेची निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता त्यांना पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून शिर्डीतून लोकसभा लढण्याची इच्छा आठवलेंनी बोलून दाखवलीय. सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेची (शिंदे गट) युती असून खासदार लोखंडे युतीकडून विद्यमान खासदार आहेत. पण आठवलेंना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून पक्ष श्रेष्ठींपुढे पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवलेंच्या या इच्छेने शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जाते.

हे सुद्धा वाचा 
पेशवे हे दुष्ट, नीच प्रवृत्तीचे होते; भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य, समाज माध्यमात नेमाडे यांच्यावर टीका 
इंदुरीकर महाराजांना पुत्रप्राप्तीसंदर्भातील ‘ते’ विधान भोवणार; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल; तीन माजी महिला न्यायमुर्तींची समिती स्थापन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन जागा लढवणार असून याबाबतचे आश्वासन देण्यात आले असल्याचा खुलासा देखील आठवलेंनी दिल्लीत बोलताना केला. याबरोबरच आगामी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाई’ला मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचेही आठवलेंनी बोलून दाखविले आहे. रामदास आठवले यांनी मोदी पंतप्रधान झाल्यावर भाजपाबरोबर घरोबा करत दोन वर्षात २०१६ मध्ये केंद्रात सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद मिळवले. आठवले हे १९९० ते १९९६ या कालावधीत आमदार होते. १९९० ते १९९५ या कालावधीत ते शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात समाज कल्याणमंत्री होते. आठवले हे दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून १९९८ ते १९९९ मध्ये खासदार झाले होते. त्यानंतर ते १९९९ ते २००९ दरम्यान पंढरपूरचे खासदार होते. केंद्रात सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असलेल्या आठवले यांच्यामुळे अन्याय झालेल्या किती दलितांना न्याय मिळवून दिला याची आकडेवारी अद्याप दिलेली नाही. तरीही ते देशभरात कायम दौरे करत असतात. पक्ष बांधणी करतात, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पण मोदी यांच्या गुडबुकमध्ये केंद्रातील जे काही मंत्री आहेत, त्यात आठवले यांचाही नंबर लागतो. त्यामुळेच की काय आठवले यांनी शिर्डी लोकसभेवर दावा सांगितला असल्याने शिदे गटात चलबिचल सुरू झाली आहे. आठवले यांचे शरद पवार यांच्यासह विरोधकांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच की काय आठवले कविता करून हसवत असतील पण त्यांच्या मागणीकडे शिंदे गट गांभीर्याने पाहत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी