28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यसातारा जिल्ह्यात भयानक परिस्थिती, बेड मिळेनात म्हणून रूग्णांची रस्त्यावर प्रतिक्षा

सातारा जिल्ह्यात भयानक परिस्थिती, बेड मिळेनात म्हणून रूग्णांची रस्त्यावर प्रतिक्षा

टीम लय भारी

सातारा : ‘कोरोना’ने सातारा जिल्ह्यात रौद्र रूप धारण केले आहे. गंभीर रूग्णांनाही रूग्णालयात दाखल करण्यासाठी बेड शिल्लक नाहीत. या आणीबाणीच्या परिस्थितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील मात्र कुचकामीपणाचे दर्शन घडवत आहेत ( Minister Balasaheb Patil shows his inefficiency ).

सिव्हील रूग्णालय, तसेच ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये खाटाच शिल्लक नाहीत. जिल्ह्यात सगळीकडे अशीच बोंब आहे. जम्बो कोविड सेंटरच्या बाहेर रूग्णवाहिका रूग्णांना घेऊन प्रतिक्षा करीत आहेत. पण त्यांना बेड मिळत नाहीत ( Balasaheb Patil fail to handel corona situation in Satara ).

बेडअभावी, तसेच वेळेत उपचार होत नसल्याने लोकांचे मृत्यू होत आहेत. या आणीबाणीच्या परिस्थितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचीही बेफिकीर वृत्ती समोर येत आहे ( Peoples are dying due to Balasaheb Patil’s negligence ).

संकटात असलेल्या रूग्णांचे ते फोन सुद्धा घेत नाहीत. माण – खटाव सारख्या तालुक्याकडे पाटील यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे ( Balasaheb Patil ignoring to Covid patients ).

रूग्ण व त्यांच्या नातलगांना अचूक मार्गदर्शन होईल, त्यांना दिलासा मिळेल यासाठी पालकमंत्री काहीही करताना दिसत नाहीत.

हे सुद्धा वाचा

Balasaheb Patil : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची वेसण भाजपच्या सुभाष देशमुखांकडे

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

देशात परिस्थिती गंभीर; आता भाजपचे पुढारी कोणाचे राजीनामे मागणार? सेनेचा सवाल

‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने अखेर रूग्णालय सरकारकडे सोपविले, पण अवघ्या 30 खाटांचे

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

निलम गोऱ्हे यांच्यावर ‘महाविकास आघाडी’चे नेते नाराज

Covid LIVE: Maharashtra sees record 985 deaths in a day, over 63,000 cases

गरजेनुसार कोविड सेंटर्सची उपलब्धता करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहेत. डॉक्टर्स, नर्स अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे.

संकटाच्या या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना करण्यासाठी कल्पक व ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्ह्यातील गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई कमी पडत आहेत.

कोविड सेंटरचे उद्घाटन, पण सुविधाच नाहीत

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतेच साताऱ्यात 78 बेडच्या नव्या कोविड सेंटरचे उद्घाटन केले ( Balasaheb Patil inaugurated new Cocid center ). पण तिथे डॉक्टर्स व इतर वैद्यकीय मनुष्यबळ यांचा तुटवडा आहे. त्यामुळे हे कोविड सेंटर कार्यान्वित झालेले नाही. कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करण्याअगोदरच मंत्र्यांनी चमकोगिरी करीत त्याचे उद्घाटन करण्याची घाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनाची लागण झालेल्या लोकांना घरीच राहावे लागत आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांनाही रूग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. अती गंभीर असलेल्या रूग्णांसाठी सुद्धा खाटा शिल्लक नाहीत, अशी दयनीय स्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सातारा प्रशासनाने एखादे एप सुरू करावे

रूग्णांना बेड, इंजेक्शन्स याबाबत तंतोतंत माहिती मिळेल, अशा पद्धतीचे एखादे एप प्रशासनाने सुरू करायला हवे. रूग्ण घरी असतानाच त्याला त्या एपद्वारे उपलब्ध बेड्सची माहिती मिळायला हवी.

सातारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने निवृत्त सनदी अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनी यापूर्वी प्रशासनात प्रभावी कामगिरी केलेली आहे. अशा अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करायला हवेत, अशा भावना सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी