29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयसहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीतूनच नाराजी

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीतूनच नाराजी

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांना दोन वर्षांपूर्वी सहकार मंत्रीपदाची लॉटरी लागली. खात्याची सूत्रे हाती घेतल्यापासूनच सुरू झालेला त्यांचा अनागोंदी कारभार अजूनही संपायला तयार नाही (Balasaheb Patil unsatisfactary work in Coopration department ).

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातूनच पाटील यांच्या विरोधात उलट नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. 

राष्ट्रवादीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे बाळासाहेब पाटील यांच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे ( NCP leader fire on Balasaheb Patil ).

‘महाराष्ट्रातील सहकार सक्षमीकरणासाठी वेळ देणारा, जनतेचे सहकारातील रास्त प्रश्न सोडवू शकेल असा कर्तव्यदक्ष सहकारमंत्री राज्याला पाहीजे. अन्यथा भाजपने सहकार क्षेत्र लक्ष्य केले आहेच’ अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याने बाळासाहेब पाटील यांच्यावर नाव न घेता तोफ डागली आहे.

हे सुद्धा वाचा

Balasaheb Patil : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची वेसण भाजपच्या सुभाष देशमुखांकडे

सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

Balasaheb Patil: Coop hsg societies with less than 250 members will be allowed to hold elections

दुसऱ्या बाजूला पक्षातून इतर अनेक छोटे मोठे पदाधिकारीही दबक्या आवाजात बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी केंद्रात नव्याने सहकार खाते तयार केले. या खात्याचे मंत्रीपद दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या अमित शाह यांच्याकडे देण्यात आले आहे. अमित शाह यांनी खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामाचा धडाका सुरू केला आहे. साखर कारखान्यांसाठी त्यांनी नव्याने दिलेल्या करमुक्तीचा निर्णय कौतुकाचा ठरला आहे.

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील मात्र असे कोणतेच नाविन्यपूर्ण घेताना दिसत नाहीत. ते राज्याचे सहकार मंत्री आहेत. पण त्यांचे कार्यक्षेत्र कराडमधील स्वतःचा मतदारसंघ आणि सह्याद्री साखर कारखाना इतपर्यंतच मर्यादीत आहे.

मंत्री म्हणून ते राज्यभरात दौरे करताना दिसत नाहीत. मराठवाडा, विदर्भाकडे तर ते ढुंकूनही पाहात नाहीत. भाजपच्या सत्ता काळात सुभाष देशमुख हे सहकार मंत्री होते. त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनाच बाळासाहेब पाटील यांनी आपलेसे केले आहे.

सहकार खात्यात कोणत्याही प्रभावी नव्या योजना ते आणत नाहीत. परंतु बदल्यांचा मात्र त्यांनी बाजार मांडला आहे. निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यामार्फत बदल्यांसारखे उद्योग चालवितात. सरकारबाहेरील निवृत्त अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे पडद्यामागून कारभार चालविणे म्हणजे स्वतःचे अवमूल्यन करून घेण्यासारखे आहे, हे सुद्धा बाळासाहेब पाटील यांना कळत नसल्याची नाराजी राष्ट्रवादीतून व्यक्त होत आहे.

बाळासाहेब पाटील यांनाही या खात्यात काम करण्यास स्वारस्य नाही. कराड मतदारसंघ आणि सह्याद्री साखर कारखाना या आवडीच्या कामासाठी पाटील यांना शरद पवारांनी मंत्रीपदाच्या ओझ्यातून मुक्त करायला हवे, अशी तिरकस अपेक्षा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली आहे ( Balasaheb Patil should work for only Karad ).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी