26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयभाजपचे नेते हरीशचंद्राची औलाद आहेत का? बच्चू कडू भडकले

भाजपचे नेते हरीशचंद्राची औलाद आहेत का? बच्चू कडू भडकले

टीम लय भारी

मुंबई :- पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी याच्या अटकेनंतर खडसेंना ईडीने समन्स बजावले होत. आज त्यांची ईडी मागील 1 तासपासून चौकशी करत आहे. यावर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. भाजपचे सर्व नेते हरीशचंद्राची औलाद आहेत का? असा खोचक टोला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाजपला लगावला आहे (Minister of State Bachchu Kadu has slammed the BJP).

आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशी बाबत विचारण्यात आले. यावेळी बच्चू कडू यांनी खडेबोल करत भाजप वर टिकांचा वर्षाव केला आहे. ईडी आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे. ईडीच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. पूर्वी लोकांच्या मतांनी सत्तांतर व्हायचे, आता भाजप ईडीने सत्तांतर करत आहेत. भाजपचे सर्व नेते हरीशचंद्राची औलाद आहेत का? भाजपचा एकही नेता भ्रष्टाचारी नाही का? एकाही भाजप नेत्यावर ईडीची कारवाई का नाही?, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावई अटकेत

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

इंग्रजानंतर सत्तेचा इतका दुरुपयोग भाजप करत आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ईडीची कारवाई करणे योग्य आहे का? ईडीच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे बच्चू कडू म्हणाले (People will take to the streets against the ED, said Bachchu Kadu).

Minister of State Bachchu Kadu has slammed the BJP
बच्चू कडू

संजय राऊतांच्या नारायण राणेंना शिवसेनेच्या भाषेत शुभेच्छा

Pune land deal: Eknath Khadse reaches ED office, says case ‘politically motivated’

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 13 तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या, तर 12 जुलैपर्यंत त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. त्याचवेळी खडसेंनाही अटक होण्याची शकत्या वर्तवण्यात येऊ लागली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी