28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमंत्रालयसरकारने ‘Unlock’ येत्या ३१ जुलैपर्यंत वाढविला; वाचा नवे निर्बंध, नव्या परवानग्या

सरकारने ‘Unlock’ येत्या ३१ जुलैपर्यंत वाढविला; वाचा नवे निर्बंध, नव्या परवानग्या

टीम लय भारी

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील अनलॉक ( Unlock ) राज्य सरकारने जाहीर केला आहे. याबाबतचा आदेश मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज जारी केला आहे ( Ajoy Mehta issued Unlock order) . त्यानुसार सुधारित अनलॉक येत्या ३१ जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे.

नव्या आदेशानुसार तातडीच्या कारणाशिवाय प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी सुद्धा आपल्या नजिकच्याच परिसरातील सेवांचा लाभ घ्यावा अशा सुचना करण्यात आल्या आहेत ( Mahavikas Aghadi Government’s new order ).

Mahavikas Aghadi

नव्या आदेशात काय आहेत सुचना ?

  • सार्वजनिक ठिकाणी, प्रवासात व कामाच्या ठिकाणी चेहरा झाकून घेणे बंधनकारक आहे
  • सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने किमान ६ फुटाचे अंतर ठेवावे. दुकानदारांनी हा निकष कसोशिने पाळावा, तसेच दुकानात पाच पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • जास्त लोक जमतील असे सोहळे आयोजित करू नयेत. विवाह सोहळ्यांमध्ये ५० पेक्षा जास्त लोक असू नयेत. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ५० पेक्षा जास्त लोकांनी जमा होऊ नये.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई आहे.
  • जास्तीत जास्त घरातूनच ( वर्क फ्रॉम होम ) काम करावे
  • कामाच्या ठिकाणी कंपन्यांनी प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे, सॅनिटाईझ सुविधा उपलब्ध कराव्यात.
  • कामाची ठिकाणे, सार्वजिक सुविधांची ठिकाणचे महत्वाचे घटक सतत स्वच्छ करावेत. उदा. दरवाजांच्या कड्या
  • कामाच्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे ( सोशल डिस्टन्शिंग ठेवावे ( Permitted activities in unlock 2.0 in Maharashtra )

सरकारने ‘Unlock’ येत्या ३१ जुलैपर्यंत वाढविला; वाचा नवे निर्बंध, नव्या परवानग्या

एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका, तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये खालील व्यवहारांना अटींसह मान्यता दिली आहे

( Mission Begin again : Permitted activities in MMR )

  • या आदेशापूर्वी परवानगी असलेल्या अत्यावश्यक सेवांची दुकाने पुढेही चालू ठेवता येतील.
  • अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने ३१ मे व ४ जूनच्या आदेशानुसार व संबंधित महापालिकांनी दिलेल्या निर्देशानुसार सुरू ठेवता येतील. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता अत्यावश्यक नसलेले बाजार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू ठेवता येतील. दारूची दुकाने परवानगी असेल तर सुरूच ठेवता येतील.
  • अत्यावश्यक व अत्यावश्यक सेवा नसलेल्या ई – कॉमर्सचे व्यवहार सुरू ठेवता येतील.
  • यापूर्वी परवानगी असलेले उद्योग – व्यवसाय पुढेही चालू राहतील.
  • खासगी व सरकारी बांधकामे सुरू ठेवता येतील. पावसाळ्यापूर्वी करावयाची सगळी कामे सुरू ठेवता येतील.
  • रेस्टॉरन्टमधील घरपोच सेवा सुरू ठेवता येईल.
  • ऑनलाईन आणि दूर शिक्षण सुरू ठेवता येईल
  • सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त १५ टक्के, किंवा १५ लोक यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थिती असू नये ( यामध्ये अत्यावश्यक सेवा, आरोग्य, अधिदान व लेखा, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, महापालिका यांना वगळण्यात आले आहे)
  • खासगी कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त १० व्यक्ती, किंवा १० टक्के यापेक्षा जास्त उपस्थिती असू नये.
  • प्रवासासाठी टॅक्सीमध्ये वाहनचालक व अन्य दोन व्यक्तींपेक्षा जास्त लोक असू नयेत. दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला परवानगी असेल.
  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा लोकांना कामे सुरू ठेवता येतील.
  • एमएमआर क्षेत्रातील महापालिकाअंतर्गत विविध जिल्ह्यांतील अत्यावश्यक सेवा व कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करता येईल. पण खरेदीसारख्या बाबींसाठी नजिकच्याच परिसराचा उपयोग करावा. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नाही.
  • व्यायामांसारख्या बाबींना अटींसह परवानगी असेल.
  • वृत्तपत्र छपाई व वितरणास परवानगी असेल.
  • शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये अशैक्षणिक कामांसाठी परवानगी असेल. उदा. ई-कन्टेट तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल जाहीर करणे यांस परवानगी आहे.
  • नाभिकांची दुकाने, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर्सना अटींच्या आधारे परवानगी असेल.

MoneySpring

वरील महापालिका क्षेत्र वगळून राज्यात खालील परवानगी देण्यात आल्या आहेत

  • खासगी आणि सरकारी प्रवासासाठी दुचाकीसाठी १ जण, तीन चाकीमध्ये वाहन चालक व दोन प्रवाशी, चार चाकीमध्ये वाहन चालक व दोन प्रवाशी अशी परवानगी असेल.
  • जिल्ह्याअंतर्गत बस सेवा चालू ठेवता येतील. पण बसमध्ये केवळ ५० टक्केच प्रवाशांना परवानगी असेल. बसमध्ये सोशल डिस्टन्शिंग ठेवावे, व सॅनिटायझेशन करावे.
  • जिल्ह्याबाहेरील व्यवहारांवर अगोदरप्रमाणेच निर्बंध असतील
  • अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने / बाजार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील.
  • लग्न सोहळ्यांना २३ जूनच्या आदेशानुसार परवानगी असेल
  • व्यायामासारख्या बाबींना अटींसह परवानगी असेल
  • वृत्तपत्र छपाई आणि वितरणाला परवानगी असेल
  • नाभिकांची दुकाने, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर्सना अटींच्या आधारे परवानगी असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी