31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमंत्रालयCoronavirus अजितदादांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ समितीची स्थापना

Coronavirus अजितदादांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ समितीची स्थापना

टीम लय भारी

मुंबई  : राज्यावरील कोरोना ( Coronavirus ) संकटाचा सर्व स्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला संपवणं, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रभावी उपायोजना करणार आहे.

Coronavirus

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे.

Coronavirus
कोरोना समितीचा जीआर

कोरोनाचा ( Coronavirus ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्था, शासनाच्या विविध यंत्रणां युद्धस्तरावर काम करत आहेत. त्यांच्या लढाईला बळ देण्याचं कामही ही समिती करणार  आहे.

राज्यात 24 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्र ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठी अकरा तज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवरही ही मंत्रिमंडळ समिती निर्णय घेईल.

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला, नरेंद्र मोदींची घोषणा

Dr.Ambedkar : पूर्ण देश चालविण्याची क्षमता असलेला एकमेव महापुरूष

रतन टाटांच्या नावाने खोटा प्रचार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी