27 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमंत्रालयCoronavirus : मंत्रालय दोन दिवस बंद, ‘कोरोना’चे रूग्ण सापडल्याने खबरदारी

Coronavirus : मंत्रालय दोन दिवस बंद, ‘कोरोना’चे रूग्ण सापडल्याने खबरदारी

टीम लय भारी

मुंबई : मंत्रालयातही ‘कोरोना’चे (Coronavirus ) रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे दोन दिवस मंत्रालय व नवीन प्रशासकीय भवन बंद करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत दोन्ही इमारतींना पूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केली आहे.

Coronavirus

मंत्रालयात ‘कोरोना’चे (Coronavirus ) रूग्ण सापडले आहेत. तब्बल चार रूग्ण सापडल्याची चर्चा सुरू आहे. मंत्रालयात ‘कोरोना’ (Coronavirus ) रूग्ण सापडल्याबद्दल राज्य सरकारने मात्र कोणतीही पुष्टी केलेली नाही.

परंतु सार्वजनिक ठिकाणे तसेच कार्यालये निर्जंतुकीकरण करण्याची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारने जारी केली आहेत. त्यामुळे मंत्रालय व नवीन प्रशासकीय भवनमध्ये त्या २९ व ३० एप्रिल रोजी निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी म्हटले आहे. या दोन्ही दिवशी मंत्रालयातील काम पूर्ण बंद राहील, असेही कुंटे यांनी नमूद केले आहे.

Coronavirus
‘कोरोना’मुळे मंत्रालय दोन दिवस बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे

मंत्रालय अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

मंत्रालयामध्येच ‘कोरोना’ (Coronavirus ) रूग्ण सापडल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली आहे. मंत्रालयामध्ये ५ टक्के अधिकारी – कर्मचाऱ्यांना कामावर येणे बंधनकारक आहे. परंतु ‘कोरोना’ने मंत्रालयातही शिरकाव केल्याने आता कामावर जायचे कसे या भीतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रासले आहे.

मंत्रालयात चार रूग्ण आढळल्याची चर्चा

मंत्रालयामध्ये चार ‘कोरोना’ रूग्ण आढळल्याची चर्चा आहे. मंत्रालयात साफसफाई करणारा खासगी कंपनीचा एक कामगार आहे. दुसरा कामगार सार्वजनिक बांधकाम खात्याचा सफाईगार आहे. या शिवाय आणखी दोघाजणांना ‘कोरोना’ची (Coronavirus ) लागण झाल्याचे आढळून आले आहे.

या चार जणांच्या संपर्कात आलेल्या जवळपास ३० जणांच्या घशाच्या स्वॅबचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : ‘आमदार कोळंबकरांच्या बेजबाबदारपणाबद्दल भाजप व देवेंद्र फडणवीस गप्प का ?’

उद्धव ठाकरेंचे खमके पाऊल : ‘कोरोना’साठी मुंबई महापालिकेत 9 IAS अधिकाऱ्यांची फौज, 3 अधिकाऱ्यांची नव नियुक्ती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी