32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमंत्रालयपीडब्ल्यूडीचे दोन अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ता १० लाखाची लाच घेताना ACB...

पीडब्ल्यूडीचे दोन अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ता १० लाखाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

टीम लय भारी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि भ्रष्टाचार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे चित्र आहे. त्यावर शिक्कामोर्तब करणारे ढळढळीत उदाहरण समोर आले आहे.( PWD officers and RTI activist arrested for accepting Rs 10 lakh bribe).

तब्बल १० लाख रुपयांची लाच घेताना पीडब्ल्यूडीचे दोन अधिकारी व एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक खाते (एसीबी) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

पीडब्लयूडीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयालाही लावली ठिगळे

पीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच लावला चूना, बोगस कामे करून लाखो रूपये लाटले

Video : सिमेंटऐवजी राख वापरा, पण मला २० टक्के रक्कम द्या; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याची कंत्राटदाराची मागणी

खळबळजनक : पीडब्ल्यूडीतील मोठा घोटाळा, घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी मंत्रालयात शिजतेय कारस्थान

पीब्ल्यूडीच्या अंधेरी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. ही बातमी लिहित असताना पंचनामा सुरू होता. संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव रमेश शाह असे आहे. शाह हा पत्रकार असल्याचे सांगून एका ठेकेदाराला ब्लॅकमेल करीत होता. त्यासाठी त्याने दहा लाखाची लाच मागितली होती. या कार्यकर्त्यासोबत शाखा अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा दोघांचाही समावेश असल्याचा संशय आहे. शेख व अंकुशराव अशी या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सहभागाविषयीसुद्धा चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी भाजपच्या आमदाराची प्रार्थना,म्हणाले..

maharashtra: 2,500 kg beef seized from van in Thane, driver held

धक्कादायक म्हणजे, शाह याने १० लाख रुपयांची ही लाच चक्क पीडब्ल्यूडीच्या कार्यालयातच स्विकारली आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि ब्लॅकमेलर यांचे कसे जाळे आहे हे सुद्धा यातून निष्पन्न झाल्याचे दिसत आहे. संबंधित कार्यकर्ता गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदाराला ब्लॅकमेल करीत होता. त्यावर संबंधित ठेकेदाराने लाच लाचलुचपत प्रतिबंधक खाते व गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सापळा लावण्यात आला होता. त्यात संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याने १० लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधित कार्यकर्ता व दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून झालेले संभाषण, एकमेकांमधील मेसेजेस याचा पोलीस तपास करीत आहेत. या तपासानंतर पीडब्ल्यूडीच्या या दोन्ही अधिकाऱ्यांचा समावेश होता किंवा नाही, हे उघडकीस येईल, असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी