31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजNFSC Recruitment 2021: ‘या’ पदांसाठी करा अर्ज

NFSC Recruitment 2021: ‘या’ पदांसाठी करा अर्ज

टीम लय भारी

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. कॉलेजने यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२१ आहे (NFSC recruitment 2021 national fire service college nagpur apply).

या पदांसाठी होणार भरती

मुख्य प्रशिक्षक

वरिष्ठ प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता काय?

ईडी, इनकम टॅक्सच्या बापालाही घाबरत नाही;राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे संतापले

आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी भाजपच्या आमदाराची प्रार्थना,म्हणाले..

मुख्य प्रशिक्षक या पदासाठी विज्ञान शाखेत पदवी किंवा इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे. तसेच नॅशनल फायर सर्व्हिस कॉलजेमधून सब ऑफिसर कोर्स पूर्ण असणं आवश्यक आहे. शिकवण्याचा आणि ट्रेनिंग देण्याचा पाच वर्षांचा अनुभवही आवश्यक असणार आहे. शारीरिक पात्रता नियमांनुसार असणं आवश्यक.

वरिष्ठ प्रशिक्षक या पदासाठीही विज्ञान शाखेत पदवी किंवा इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे. अग्निशमन दलातील जवान म्हणून दोन वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. शारीरिक पात्रता नियमांनुसार असणं आवश्यक आहे.

दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता – राजेश टोपे

Maharashtra Restaurants Allowed To Stay Open Till 12 AM, Shops Till 11 PM

पगार किती?

मुख्य प्रशिक्षक या पदासाठी ४४,९०० ते १,४२,४०० रुपये प्रतिमहिना पगार असेल.

वरिष्ठ प्रशिक्षक या पदासाठी ३५,४०० ते १,१२,४०० रुपये प्रतिमहिना पगार असेल.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

महानिर्देशालय अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्ड, पूर्व ब्लॉक -७, स्तर -७, आर. पुरमा, नवी दिल्ली – ११००६६

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी