27 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeमंत्रालयWinter session : हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून मुंबईतच होणार

Winter session : हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून मुंबईतच होणार

टीम लय भारी

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) मुंबईतच होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी किती असावा याबाबतचा निर्णय १ डिसेंबर रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवला जाणार आहे. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. (The winter session will be held in Mumbai from December 7)

सरकारचा पळ काढण्याचा प्रयत्न – गिरीष महाजन

भाजपचे आमदार गिरीष महाजन यांनी यावरुन सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘किमान १५ दिवस अधिवेशन व्हावे ही आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशन कालावधी कमी ठेवायचा, चर्चा फार करायची नाही, अशी सरकारची भूमिका दिसते आहे. पळ काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपूरला व्हावे ही आमची मागणी होती.’

सरकारला कोणत्याही प्रश्नावर चर्चा करायची नाही – राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे की, ‘शेतीचे नुकसान, मराठा आरक्षण यावर सरकारला चर्चा करायची नाही, असे वाटते आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री कोरोनाचे कारण देत असतील तर कोरोना स्थिती हाताळण्यात ते कमी पडले का?’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी